“गोपीचंद नया नया पंछी है, ज्यादा फड़फड़ करता है”

मुंबई | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता भाजपने आक्रमकपणे महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आल्यानंतर भाजप नेते आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

अशातच आता राज्यात दोन ओबीसी नेते आमने सामने आले आहेत. सध्या राज्यात गोपीचंद पडळकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं दिसत आहे.

गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसापूर्वी मागसवर्गीय आयोगाच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

वडेट्टीवारांनी फक्त टक्केवारासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची फुकटं घावलं आणि गाव सारं धावलं, अशी अवस्था केली आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती.

त्यावर आता विजय वडेट्टीवार यांनी हिंदीत प्रत्युत्तर दिलं आहे. पडळकर नया नया पंछी असून नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है, असं उत्तर वडेट्टीवार यांनी दिलंय.

दरम्यान, राज्य मागासवर्गीय आयोगाच्या मुद्द्यावरून पेटलेलं राजकारण आता आणखी पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पडळकर वडेट्टीवार यांच्या टीकेला काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“कंडोमपेक्षा कोरोना टेस्ट महत्त्वाची, सेक्सपूर्वी हे नक्की करा”

किरण माने प्रकरणाला वेगळं वळण! सहकलाकारांनी केलेल्या आरोपामुळं खळबळ

 विराटनंतर कॅप्टन कोण???, लिटल मास्टरने घेतलं ‘या’ खेळाडूचं नाव

अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद

शाळा सुरू करण्यासंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…