मुंबई विमानतळावरून दररोज 25 विमाने करणार उड्डाण; ठाकरे सरकारचा निर्णय!

मुंबई | केंद्र सरकारनं मर्यादित स्वरूपात विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, उद्यापासून देशातंर्गत प्रवासी विमान वाहतुकीला सुरूवात होणार असल्याचं कळतंय. केंद्राच्या निर्णयानंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्याचं लक्ष होतं.

राज्य सरकारनं मुंबई विमानतळावरून विमान वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून दररोज 25 विमान उतरणार असून, तितकेच उड्डाण करणार आहे, मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे.

चौथ्या लॉकडाउनची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातून अनेक सेवा आणि व्यवहारांना शिथिलता देण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानंतर एनडीआरएफनं याविषयीची नियमावली जारी केली होती. यात विमानसेवा बंद राहिल, असं म्हटलं होतं. मात्र सरकारनं निर्णयात फेरबदल करत मर्यादित स्वरूपात देशातंर्गत विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मुंबई विमानतळावरून देशातंर्गत विमान वाहतूक करण्यास सरकारनं संमती दिली आहे. मुंबई विमानतळावर दररोज 25 विमान उतरणार आहेत. त्याचबरोबर 25 विमान उड्डाण करतील. विमान फेऱ्यांची संख्या हळूहळू वाढवली जाईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा, सोबतच केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

-‘सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंकर’; गुजरात सरकारला उच्च न्यायालयाने सुनावलं

-चिंताजनक! राज्यात चोवीस तासात 87 पोलिसांना कोरोनाची लागण

-31 मेनंतर लॉकडाऊन संपणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…

-‘…तर पुन्हा सगळं बंद करावं लागणार’; उद्धव ठाकरेंचा इशारा