महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागाची साईट हॅक!

मुंबई : महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागाची साईट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. या साईटवर गेल्यानंतर सर्वात शेवटी आधार लिंक करण्याच्या लोगोवर क्लिक केल्यावर एक पॉर्न साईट ओपन होत आहे, अशी माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्र शासनाची उच्च व तंत्र शिक्षण ग्रंथालय संचालनालयन विभागाची ही साईट आहे. ही साईट हॅक झाल्याची माहिती ग्रंथालय संचालनालय विभागाने दिली असल्याचं समजतय.

सरकारी साईट हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही अनेक सरकारी साईट हॅक झाल्या आहेत. पाकिस्तानमधून देखील अनेक भारतीय साईट हॅक झाल्या आहेत. पण हे प्रकरण आत्ताच समोर आल्याचं कळतंय.

दरम्यान, आधार संबंधित अनेक गोष्टी लोकं नेटवर सर्च करत असतात. त्यामुळे आधारलाच हॅकरने लक्ष्य केलं आहे. आधार लिंकच्या लोगोवर पॉर्न साईट लिंक केली, अशी माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या-