महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता, ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई | देशात सध्या सर्वत्र महागाईचा भडका उडालेला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट करण्याचा निर्णय घेतला होता. परिणामी केंद्राच्या पाठोपाठ आता राज्या सरकारनंही इंधन दर घटवण्याची मागणी होतं आहे.

कोरोना महामारीच्या काळात इंधनाच्या किंमती हळूहळू वाढत गेल्या होत्या. कोरोनापूर्वी 70 च्या घरात असणारं पेट्रोल आता 110 रूपये प्रतिलीटरच्या पूढे गेलं आहे. तर डिझेल शंभरच्या पूढे आहे.

सतत वाढत चाललेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरून केंद्र सरकारला मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागत होतं. परिणामी केंद्र सरकारनं किंमतीत घट करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावेत अशी मागणी होत आहे. याच पार्श्वभूमिवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक होत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या करात कपात करण्यावर आता राज्य सरकार विचार करत आहे. कारण देशातील महत्त्वाच्या राज्यात करकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 5 आणि 10 रूपये घट केली होती. परिणामी काही राज्यांनी आपापल्या परिनं किंमती घटवण्यास सुरूवात केली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सर्वात मोठी कपात कर्नाटक राज्यात करण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये पेट्रोल 13.25 रूपयांनी कमी झालं आहे. यानंतर पद्दुचेरी आणि मिझोराम यांचा क्रमांक लागतो.

उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या बैठकीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य राज्य मानलं जातं. परिणामी आता इंधन दरकपातीचा निर्णय राज्यात होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, काॅंग्रेसशासित पंजाब सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या व्हॅट दरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अनुक्रमे 10 आणि 5 रूपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या शेजारची राज्य करकपात करत असताना महाराष्ट्र सरकार कर कपात का करत नाही, असा सवाल विरोधी पक्ष भाजपनं केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

मी पंतप्रधान झालो तर पहिला निर्णय ‘हा’ घेईन- राहुल गांधी 

“अश्रू ढाळू नका तर असे प्रकार घडू नयेत म्हणून कोणती पावलं उचलणार ते सांगा” 

येत्या 24 तासात ‘या’ भागात पडणार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

  25 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल!