वाढदिवसाला हारतुरे केक नको, पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करा- मुरलीधर मोहोळ

पुणे | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी पुणेकरांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांना पत्र लिहित एक विनंतीही केली आहे.

मला वाढदिवसाला हारतुले नको, भेटवस्तू नको. पुण्यात रक्ताचा तुटवडा आहे. यामुळे कृपया आपण रक्तदान करून मला शुभेच्छा द्याव्यात, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी आणि पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण यामुळे पुणे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून केवळ 5 ते सहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध होत आहे, असं मोहोळ यांनी सांगितलं आहे.

व्यापक पातळीवर रक्तदानाची नितांत आवश्यकता आहे. हाच रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन माझा वाढदिवस ‘रक्तदान संकल्प दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.

मंगळवार, दि. 9 नोव्हेंबर, 2021 रोजी शुभारंभ लॉन्स येथे सकाळी 8 पासून रात्री 8 पर्यंत आपल्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे.

वाढदिवसाच्या शुभेच्छा पुष्पगुच्छ, 8 हार-तुरे, केक, भेटवस्तू किंवा होर्डिंगच्या माध्यमातून देण्याऐवजी रक्तदान करून द्याव्यात, असं महापौर मोहोळ यांनी म्हटलंय.

वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी मित्र परिवारासह पक्ष सहकारी, हितचिंतक, कार्यकर्ते वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा देतात. त्या सर्वांना माझी विनंती आहे. यंदाच्या वर्षी शहरातील रक्तपिशव्यांची तूट लक्षात घेता रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत शुभेच्छा द्याव्यात, असं त्यांनी पत्रात म्हटलंय.

दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ उद्या 9 नोव्हेंबर रोजी आपला 47 वा वाढदिवस साजरा करतायत. राजकीय नेते मंडळींचा वाढदिवस म्हणजे शुभेच्छांचे शेकडो फ्लेक्स, हजारोंची गर्दी,पार्ट्या, जेवणावळी, पण पुण्याचे महापौर याला अपवाद आहेत.

आपल्या वाढदिवसादिनी त्यांनी सध्याची रक्ताच्या तुटवड्याची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे.

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या 

महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता, ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

मी पंतप्रधान झालो तर पहिला निर्णय ‘हा’ घेईन- राहुल गांधी 

“अश्रू ढाळू नका तर असे प्रकार घडू नयेत म्हणून कोणती पावलं उचलणार ते सांगा” 

येत्या 24 तासात ‘या’ भागात पडणार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

  25 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल!