कोल्हापूर महाराष्ट्र

कोल्हापुरात खजाना गवसला; शेतकऱ्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं मडकं सापडलं

कोल्हापूर | कोरोना संकटात राज्यावर आर्थिक संकट आहे. या कठीण काळात आर्थिक चक्र चालवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. या आर्थिक संकटकाळात कोल्हापुरात खजाना सापडला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण शाहूवाडी तालुक्यात आहेत. मात्र याच शाहूवाडीत सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं मडकं सापडल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

शाहूवाडी तालुक्यातील अनुस्कुरा येथे जमीन सपाटकीकरण करत असताना, शेतकऱ्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं मडकं सापडलं. काजू लागवडीसाठी सपाटीकरण करत असताना विनायक पाटील यांच्या शेतात हे सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं मडकं सापडलं.

या मडक्यात तब्बल 710 सोन्याची नाणी आहेत. पन्हाळा प्रांताधिकारी अमित माळी यांनी शासकीय मूल्यांकन करत सर्व नाणी ताब्यात घेतली.

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथं पत्र; केली ‘ही’ मागणी

-एक जूननंतर लॉकडाउन हटवणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

-तिजोरी उघडा आणि गरजूंना तात्काळ मदत करा- सोनिया गांधी

-पृथ्वीराज चव्हाण यांचं हे आव्हान देवेंद्र फडणवीस स्वीकारतील का?

-…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा