पुण्यातील मनसे कार्यालय ‘भगवा’मय!

पुणे |  महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) लवकरच आपल्या पक्षाची भूमिका आणि आपल्या पक्षाच्या झेंड्यामध्ये बदल करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यातच पुण्यातील मनसेच्या कार्यालयात भगवा रंग देण्यात आला आहे. त्यामुळे एकच चर्चा सुरु झाली आहे.

येत्या 23 जानेवारी रोजी मनसेचं पहिलचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे मोठा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण यापूर्वीच रंगरंगोटी करण्यात येत असून कार्यालयातील भगवा रंग लक्ष वेधून घेत आहे.

मनसेच्या कार्यालयाबाहेर भगवे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावर राज ठाकरेंचे फोटो आहेत. यामध्ये ‘माझा लढा महाराष्ट्र धर्मासाठी’ असं लिहिलं आहे. हे सर्व पाहता राज ठाकरे भाजपसोबत युती करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भाजप-मनसे युती होणार का? याबाबत दोन्ही पक्षातील नेत्यांना विचारले असता त्यांच्याकडून अनुकूल प्रतिसाद येत आहे. त्यामुळे भाजप-मनसे युतीच्या शक्यता बळावल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-