“आता कच खाऊ नका”; उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला राज ठाकरेंचा पाठिंबा

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) स्थापनेनंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा लावून धरला आहे. वेळोवेळी राज ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून आंदोलने केलेली दिसतात.

अशातच राज्यातील सर्व दुकानावरील पाट्या या मराठीत भाषेत असाव्यात, अशी मागणी मनसे गेल्या अनेक वर्षापासून करताना दिसत आहे.

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत एक प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावाला अखेर मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.

त्यामुळे आता राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या दुकानावरील पाट्या मराठी भाषेतून ठेवाव्या लागणार आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याच मुद्द्यावर भाष्य केलंय.

राज्यातील दुकानावरील सर्व पाट्या या मराठी भाषेत असाव्यात यासाठी 2008 आणि 2009 साली महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलनं केली होती. त्यावेळी त्यांना जेलमध्ये देखील जावा लागलं होतं, असं राज ठाकरे म्हणाले.

यात आणखी एक भानगड सरकारने करुन ठेवलीय की, मराठी भाषेशिवाय इतर भाषा नामफलकांवर चालतील, परंतु याची काय गरज आहे का?, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील आहे, म्हणजे मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वाना समजते. इथं फक्त मराठीच चालणार याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका, असा सजक इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला आहे.

राज्यात मराठी फलक असतील त्याचं श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे, असंही राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी सरकारचं अभिनंदन देखील केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

गोल्डनमॅन सचिन शिंदे हत्या प्रकरणी खळबळजनक माहिती समोर!

उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी उलथापालथ, भाजपला सलग सातवा झटका 

भारतातील कोरोना स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘… तर घरीच उपचार घ्या’; जाणून घ्या सरकारच्या या मार्गदर्शक सूचना 

“पंतप्रधानांबद्दल बोलताना आपली उंची किती बोलतो किती, हा विचारही राऊतांनी करावा”