मुंबई | महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे ट्विटरवर कायमच अॅक्टीव्ह असतात. अनेकदा ते आपल्या ट्विटर अकाऊंटवरून वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो ते शेअर करत असतात.
ट्विट करत वेगवेगळ्या गोष्टींना प्रोत्साहित करण्याचं काम ते कोरोनाच्या आधीपासून करत आले आहेत. तर काहींना त्यांनी मोठमोठे गिफ्ट देखील पाठवले आहेत. अशातच त्यांनी एका मुलाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण मुलगा खांद्यावर बॅग लटकवून रस्त्यावरून पळताना दिसत आहे. त्यावेळी एक कारवाला त्याठिकाणी येऊन कारमध्ये बसण्याचं आवाहन करतो.
रस्त्यावर धावणाऱ्या मुलाचं नाव आहे प्रदीप मेहरा आहे. तो दररोज 10 किमी धावत घरी जातो. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्यावर आता आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलं आहे.
ते खरोखर प्रेरणादायी आहे, असं आनंद महिंद्रा म्हणाले. पण माझी सोमवारची प्रेरणा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का?, असा सवाल देखील त्यांनी नेटकऱ्यांना विचारला.
तो इतका स्वतंत्र आहे आणि राइड ऑफर नाकारतो हे तथ्य आहे, असं ते म्हणतात. त्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही. तो आत्मनिर्भर आहे, असं महिंद्रा म्हणाले आहेत.
दरम्यान, दररोज काम करून नंतर आपल्या स्वप्नांच्या मागे धावणार्या प्रदीपचं सध्या कौतुक होताना दिसत आहे. त्याच्या या कष्टाला यश मिळो, हीच आता सर्वजण प्रार्थना करत आहेत.
पाहा ट्विट-
This is indeed inspiring. But you know what my #MondayMotivation is? The fact that he is so independent & refuses the offer of a ride. He doesn’t need help. He is Aatmanirbhar! https://t.co/8H1BV4v5Mr
— anand mahindra (@anandmahindra) March 21, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
Knee pain: कमी वयातच गुडघे दुखतात का?, ही लक्षणं दिसताच वेळीच सावध व्हा
“भाजपला झुंडचा इतका तिरस्कार आणि द कश्मीर फाइल्सचा इतका पुळका का?”
Plane Crash in China: चीनमध्ये मोठा अपघात, 133 जणांसह प्रवासी विमान कोसळलं
नोरा फतेहीचा 10 वर्षांपूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
ममता बॅनर्जी शाळकरी विद्यार्थ्यांबाबत घेणार ‘हा’ मोठा निर्णय