महिंद्रा कंपनीने लाँच केली जबरदस्त कार; 6 एअरबॅगसह अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये मिळणार; पाहा किंमत

Mahindra Scorpio-N Z8 Select Variant Launch l देशातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने भारतीय बाजारपेठेत आणखी एक एसयूव्ही कार लाँच केली आहे. कंपनीने Scorpio-N Z8 प्रीमियम श्रेणीचा एक नवीन प्रकार लाँच केला आहे. या नवीन व्हेरियंटचे नाव Scorpio-N Z8 Select असे आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये Z8 आणि Z8L व्हेरिएंट आधीच समाविष्ट आहेत. या कारमध्ये कंपनीने सेफ्टी फीचर्ससोबतच इंटीरियर आणि एक्सटीरियरवर विशेष लक्ष दिले आहे.

Mahindra Scorpio-N Z8 कारची किंमत काय असणार? :

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या कारची सुरुवातीची किंमत 16.99 लाख रुपये आहे आणि टॉप वेरिएंटची किंमत 18.99 लाख रुपये आहे. कंपनीने ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रकारात सादर केली आहे. तसेच तुम्हाला ही कार दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये म्हणजेच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळते.सर्वात महत्वाचं म्हणजे ही कार 1 मार्च 2024 पासून कंपनीच्या डीलर्सकडे उपलब्ध होणार आहे.

Mahindra Scorpio-N Z8 Select Variant Launch l कारमध्ये सेफ्टी फीचर्स काय असणार? :

सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या कारमध्ये स्टँडर्ड फीचर म्हणून 6 एअरबॅग उपलब्ध असतील. तसेच, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण मानक वैशिष्ट्य म्हणून उपलब्ध आहे. याशिवाय कंपनीच्या Scorpio-N ला ग्लोबल NCAP कडून 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.

Mahindra Scorpio-N Z8 इंजिन स्पेसिफिकेशन्स :

कंपनीच्या या कारमध्ये 2 लीटर टर्बो इंजिन आहे, जे जास्तीत जास्त 200 PS पॉवर आणि 380 Nm पीक टॉर्क जनरेट करते. याशिवाय कारमध्ये 2.2 लीटर डिझेल प्रकार देखील उपलब्ध आहे, जो 175 पीएस पॉवर आणि 400 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करतो. कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे.

Mahindra Scorpio-N Z8 Select Variant Launch l कारमध्ये 8-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 7-इंचाची रंगीत TFT स्क्रीन आहे. याशिवाय कारमध्ये 60 हून अधिक कनेक्टेड कार फीचर्स उपलब्ध आहेत. तसेच कारमध्ये अलेक्सा, सनरूफ आणि वायरलेस अँड्रॉइड आणि ॲपल कार प्ले सिस्टम देखील देण्यात आली आहे.

News Title : Mahindra Scorpio-N Z8 Select Variant Launch

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी येणार PM किसान योजनेचा 16 हप्ता

या तारखेपासून सुरू होणार खरमास; या कालावधीत लग्न समारंभ पूर्णतः बंद राहणार

मार्च महिन्यात बँकांना भरमसाठ सुट्या, एवढ्या दिवस बँका राहणार बंद!

आज महाविकास आघाडी पुण्यात लोकसभा निवडणुकीचे रणशिंगे फुंकणार

आजचे राशिभविष्य! सोने-चांदीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास लाभ होईल