“पैहचान कौन?”, कोंबडीचा फोटो शेअर करत मलिकांचा रोख कोणावर?

मुंबई | विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला मुंबईत सुरूवात झाली आहे. 28 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. अधिवेशनाचा दुसरा भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या म्याऊ म्याऊ या घोषणेने गाजला होता.

नितेश राणे यांनी विधानभवनाबाहेर आंदोलन करताना शिवसेना (Shiv Sena) नेते तथा राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aditya Thackeray) येताचं म्याऊ -म्याऊ अशा घोषणा दिल्या होत्या.

मागील काही महिन्यांपासून राणे कुटुंबीय आणि शिवसेना आमने सामने आल्याचं दिसत आहे. अशातच आदित्य ठाकरेंना पाहताच नितेश राणे यांनी दिलेल्या म्याऊ म्याऊच्या घोषणेमुळे चांगलाच वाद रंगला आहे.

आदित्य ठाकरे यांना पाहून म्याऊ म्याऊ जाणीवपूर्वक केलं, कारण वाघाचं मांजर झालं आहे. आता बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली होती.

नितेश राणे यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केवळ दोन शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एका कोंबडीचा फोटो शेअर केला आहे.

कोंबडीचा फोटो शेअर करत त्याला पैहचान कौन?, असा मथळा देखील दिला आहे. त्यामुळे आता या फोटोची सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे.

काही दिवसांपू्र्वी शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यातील वाद समोर आला होता. त्यावेळी शिवसैनिकांनी कोंबडी चोर म्हणून पोस्टर लावले होते. याच मुद्द्यावर मलिकांनी पुन्हा बोट ठेवलं आहे.

दरम्यान, नारायण राणे यांनी ज्यावेळी शिवसेना सोडली होती त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना कोंबडी चोर म्हणून हिनवलं होतं. याच शब्दांवरून शिवसैनिक राणे कुटुंबीयांवर निशाणा साधत असतात.

पाहा ट्विट-

महत्वाच्या बातम्या –

‘…म्हणून धोनीला मेन्टाॅर केलं’; कोहली-बीसीसीआय वादानंतर नवा खुलासा

 रामदास कदमांचं पुन्हा बंड! अधिवेशनात ठाकरे सरकारला दिला थेट इशारा

“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”

‘मांजर आडवं गेलं तर थांबू नये’; शिवसेनेचा नितेश राणेंवर हल्लाबोल

1 व्यक्ती 4 डोस; Omicronला रोखण्यासाठी देश सज्ज