…तर राज्यात निर्बंध वाढवा, शरद पवारांनी दिल्या सूचना

मुंबई | राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे.

कोरोना रूग्णांच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी गरज असेल तर राज्यात निर्बंध वाढवा, अशा सूचना शरद पवार यांनी राज्य सरकारला दिल्या आहेत.

कोरोनाचा वाढता संसर्ग, रूग्णसंख्या, त्यात सातत्याने होणारी वाढ आणि परिणामांची माहिती घेत राहा. खबरदारी म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा व गरज असेल निर्बंध वाढवा, अशा सूचना शरद पवारांनी दिल्या असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

शरद पवारांनी लोकांची वाढती गर्दी आणि रूग्णसंख्येवरून चिंता व्यक्त केल्याचंही राजेश टोपेंनी सांगितलं. सर्व राजकीय व अराजकीय कार्यक्रम थांबवण्याबाबत शरद पवारांनी बजावल्याचंही टोपे म्हणाले.

राज्यातील आजाराची प्रमुख कारणं, त्याचे प्रमाण, सरकारने केलेल्या उपाययोजना, सरकारी व खासगी रूग्णालयातील उपचार व्यवस्था, संभाव्य निर्बंध आणि त्याची परिणामकारकता यासारख्या विषयांवर राजेश टोपे व शरद पवार यांच्यात चर्चा झाली.

कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी करा. मात्र, या उपाययोजनांमुळे लोकांना विनाकारण त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही शरद पवार यांनी दिल्या आहेत.

यापुढच्या काळात आवश्यकता वाटली तर काही निर्बंध लागू करण्याच्या सूचना शरद पवारांनी केल्या. लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्याबाबत चर्चा झाली, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, राज्यात लॉकडाऊन नाही पण निर्बंध कठोर करण्याचा सरकारचा विचार आहे. निर्बंध लादले तरी कोणतेही व्यवहार पूर्णपणे थांबवण्याचा सरकारचा विचार नाही.

लोकांनी विनाकारण प्रवास न करण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. तूर्तास तरी जिल्हांतर्गत प्रवासावर कोणत्याही स्वरूपाची बंदी नसेल, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

रूणाला oyo वरून रूम बुक करणं पडलं महागात, घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

राज्यात कोरोनाचा शिरकाव; आठवड्याभरात तब्बल ‘इतक्या’ पोलिसांना कोरोनाची लागण

‘लस नाही, तर रेशनही नाही’; ‘या’ भागात नवे आदेश

‘कोणाच्याही भावना दुखावल्या जातील असं काम करु नक’; ‘त्या’ ट्विटवरुन चंद्रकांत पाटलांचा इशारा

रश्मी ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट चांगलंच भोवलं, भाजप नेत्याची सहा तास चौकशी