मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट करून केल्या जाणाऱ्या कारवाया, भाजपच्या नेत्यांंकडून सातत्याने होणारे आरोप आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारची केली जाणारी बदनामी याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेतून संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप करताना ‘झुकेगा नही’ असा इशाराही दिला. त्यांच्या या पत्रकार परिषदेवर भाजपमधून प्रतिक्रिया येत आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर यांच्या बरोबरच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी ट्वीट केलं आहे.
आज फिर एक बिल्लीने दहाडने की कोशिश की है’ असं ते ट्वीट आहे. त्यांच्या ट्वीटचा रोख संजय राऊत यांच्याकडं आहे. अप्रत्यक्षपणे त्यांनी संजय राऊत यांना मांजराची उपमा दिली आहे.
आज पुन्हा एका मांजरानं डरकाळी फोडण्याचा प्रयत्न केला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. #Maharashtra असा हॅशटॅगही त्यांनी दिला आहे. अमृता फडणवीसांनी केलेल्या या टीकेला आता शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांना टोला लगावला. त्यास शिवसेनेच्या महिला नेत्या आणि आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिलं आहे.
शेर की दहाड से डरी हूई बिल्लीया आवाज निकालने की कोशीश कर रही है।…. मामी गप्प बसा! असं ट्विट कायंदे यांनी केलं आहे. तत्पूर्वी अमृता फडणवीस यांनीही शिवसेनेला मांजर म्हटलं होतं.
शेर की दहाड से डरी हूई बिल्लीया आवाज निकालाने की कोशीष कर रही है।
मामी गप्प बसा!#SanjayRaut #ShivSena #Mumbai #Maharashtra #BJP @ShivsenaComms @rautsanjay61
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) February 15, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
प्रेस कॉन्फरन्समध्ये सोमय्यांनी प्रत्यक्ष हातात जोडे घेतले, म्हणाले, ‘मारा मला मी…’
“खुशाल चौकशी करा, मी मुलासह जेलमध्ये जाण्यास तयार, पण… “
काळजी घ्या! कोरोनाबाधित रुग्णांवर केलेल्या संशोधनातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर
मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू
“संजय राऊतांवर 420 चा गुन्हा दाखल करा, त्यांनी आम्हाला फसवलंय”