“कोणी ब्लॅकमेलर म्हणत असेल तर होय मी ब्लॅकमेलर आहे”

नवी दिल्ली | राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी पत्रकार परिषद शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे घेतली. आता या पत्रकार परिषदेवर टीका टीपण्णी करण्यात येत आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून सातत्यानं शाब्दिक वाद रंगलेला पाहायला मिळालेला आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये सातत्यानं वाद होतात मात्र सध्या या वादाला केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईची किनार लाभेलेली आहे. परिणामी दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

राऊत यांनी सोमय्या हे ईडीला हाताशी धरून आम्हाला ब्लॅकमेल करत असल्याची टीका केली होती. तसेच सोमय्या यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यानंतर सोमय्यांनी राऊत यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी नागरिकांसाठी लढणं याला जर कोणी ब्लॅकमेलर म्हणत असेल तर होय मी सवाई ब्लॅकमेलर आहे, असं उत्तर सोमय्या यांनी दिलं आहे.

रश्मी ठाकरेंचं नाव मी घेत नव्हतो पण राऊत यांनीच मुद्दाम तो विषय काढला आहे. त्या 19 बंगल्यांच्या विषयाचा उल्लेख पहिल्यांदा संजय राऊत यांनी केल्याचा पलटवार आता सोमय्यांनी केला आहे.

पीएमसी बॅंक घोटाळ्यात किरीट सोमय्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला होता. त्यावर बोलाताना सोमय्यांनी राऊतांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

पीएमसी बॅंक घोटाळ्यात आमचा कसलाही सहभाग नाही. ठाकरे सरकारला वाटत असेल तर सरकारनं चौकशी करावी, असं सोमय्या म्हणाले आहेत. परिणामी ठाकरे सरकार काय भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, सोमय्या आणि राऊत यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. राज्यासह देशाच्या राजकारणात सध्या या दोन नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“खुशाल चौकशी करा, मी मुलासह जेलमध्ये जाण्यास तयार, पण… “ 

काळजी घ्या! कोरोनाबाधित रुग्णांवर केलेल्या संशोधनातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू

“संजय राऊतांवर 420 चा गुन्हा दाखल करा, त्यांनी आम्हाला फसवलंय” 

युक्रेन-रशिया संघर्ष टोकाला! हल्ला होण्याची भीती असताना रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा