‘बरासकरची सगळी हिस्ट्री माझ्याकडे आलीये…’; मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट!

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जिवाची परवा न करत रात्रंदिवस आंदोलन करत आहेत. आरक्षण मिळावं यासाठी जरांगे सरकारसोबत याबाबत वारंवार बैठका घेत आहेत. तसेच काही महिन्यापूर्वी राज्यात जाऊन सभा देखील घेतल्या मराठा बांधवांनी जरांगेंच्या सभेला पाठिंबा देखील दिला. दरम्यान, सरकारने आरक्षणा संदर्भात एक दिवसीय अधिवेशन घेतलं. यावेळी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्यात आलं. मात्र सध्या चर्चा होत आहे ती जरांगेंच्या जिवलग मित्राची.

बरासकर हा शिंदेंच्या प्रवक्त्याचा ट्रॅप-

जरांगे यांचे खास मित्र तसेच महाराज अजय बरासकर यांनी जरांगेंवर (Manoj Jarange) काही आरोप केले आहेत. केलेल्या आरोपांवर जरांगे पाटील यांनी बरासकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलत असताना जरांगे म्हणाले की, अजय महाराज बरासकर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप आहे. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही एक नेता आहे, असं मनोज जरांगे म्हणालेत.

सगळी हिस्ट्री माझ्याकडे आहे-

बारसकरने बोलताना एक शब्द वापरला आहे. तो मराठा बांधवांनी आणि आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. तो म्हणाला की, “तुकाराम महाराजांसाठी माझं मरण आलं तरी चालेल. एक बळी असा राहिल की जो तुकाराम महाराजांसाठी मेला. न्याय देण्यासाठी मेला. पण हा न्याय देण्यासाठी मरणाऱ्यातला नाहीये. याची सगळी हिस्ट्री माझ्याकडे आली, असं मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले”.

पुढे जरांगे म्हणाले की, एक कोणतं तरी संस्थान आहे आणि त्याच्या नवाखाली बरासकरने 300 कोटी रुपये लोकांकडून जमा केले आहेत. बरासकरचं मूळ गाव वेगळं आहे. तो भिशी घेऊन पळून गेला आहे.

बरासकार तू मरणारच नाहीस-

जरांगेंवर आरोप करायचे आणि तुकाराम महाराजांचं नाव घेऊन मरतो म्हणायचं पण तू तुकाराम महाराजांसाठी नाही मरायला लागला. तू त्या महाराज शब्दासाठी डाग आहेस. तू इतके कुटाणे केलेत की तू मरणारच आहेस. असं मरण्यापेक्षा याला तुकाराम महाराजांचं नाव घेऊन सहानुभूती घेऊन मरायचं आहे, असंही मनोज जरांगे म्हणाले.

News Title : manoj jarange makes the blast of ajay baraskar

महत्त्वाच्या बातम्या-

WhatsApp ने लाँच केले धमाल फीचर्स; चॅटिंग करताना येणार मज्जाच मज्जा

रकुलप्रीत सिंह आणि जॅकी भगनानी अडकले लग्नबंधनात; अभिनेत्रीचा लेहेंगा होतोय प्रचंड व्हायरल

राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी! माजी राज्यपालांच्या घरावर सीबीआयचे छापे

दिलासादायक! केंद्र सरकारने 5 कोटी शेतकऱ्यांना दिली मोठी भेट

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींना पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात