WhatsApp ने लाँच केले धमाल फीचर्स; चॅटिंग करताना येणार मज्जाच मज्जा

WhatsApp new Feature l वापरकर्त्यांसाठी WhatsApp कायमच नवनवीन फीचर्स सादर करत असते. आता व्हॉट्सॲपने टेक्स्ट मेसेजिंग यूजर्ससाठी टूलकिट सादर केले आहे. ज्यामध्ये वापरकर्ते बुलेट, नंबर आणि हायलाइटर वापरू शकतात. व्हॉट्सॲपने युजर्ससाठी नवीन फीचर आणले आहे. हे फीचर व्हॉट्सॲपमध्ये मजकूर लिहिताना वापरता येणार आहेत. व्हॉट्सॲपच्या या फीचरला टेक्स्ट फॉरमॅटिंग टूल असे म्हणले जाणार आहे.

ज्यामध्ये युजर्स आता मजकूर लिहिताना बुलेट, नंबर, ब्लॉक आणि इनलाइन वापरू शकणार आहेत. व्हॉट्सॲप टेक्स्ट फॉरमॅटिंग टूल काही शॉर्टकटद्वारे वापरले जाऊ शकते, ज्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. व्हॉट्सॲपचे टेक्स्ट फॉरमॅटिंग टूल फीचर अँड्रॉइड, वेब, आयओएस आणि मॅक वापरकर्त्यांसाठी सादर करण्यात आले आहे. जे वापरकर्ते वैयक्तिक चॅट, ग्रुप चॅटमध्ये वापरू शकतात. चॅनल आणि ग्रुप ॲडमिनिस्ट्रेटर देखील हे फीचर वापरू शकतात.

WhatsApp new Feature l बुलेट कसे वापरता येणार? :

मजकूर लिहिताना, काहीतरी नवीन सुरू करण्यापूर्वी बुलेट वापरणे सामान्य आहे. यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपवर फार काही करण्याची गरज नाही. तुम्हाला ज्या वाक्यात बुलेट लावायची आहे त्या वाक्याच्या सुरुवातीला आणि शेवटी फक्त ‘_’ वापरावे लागेल. यानंतर एंटर दाबल्यावर, पुढील वाक्यात बुलेट आपोआप दिसेल. (whatsapp bullet feature shortcut key)

नंबर कसे वापरावे? :

एकदा व्हॉट्सॲपमध्ये नंबरिंग सक्रिय झाल्यानंतर, एंटर दाबल्यावर ते आपोआप पुढील वाक्यापूर्वी दिसेल. यासाठी तुम्हाला ज्या ठिकाणी नंबरिंग सुरू करायचे आहे तेथे 1. लिहावे लागेल. यानंतर एंटर दाबल्यावर दुसरा क्रमांक आपोआप सुरू होईल.

हायलाइट कसे वापरावे? :

जर तुम्हाला चॅट किंवा मेसेजमध्ये कोणताही शब्द किंवा वाक्य हायलाइट करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला ‘>’ वापरावे लागेल. येथे नमूद केलेले शॉर्टकट वापरण्यासाठी, तुम्हाला ते वापरण्यापूर्वी आणि नंतर जागा वापरावी लागेल.

WhatsApp new Feature l इनलाइन कोड वापरा :

इनलाइन कोड वापरण्यासाठी, तुम्ही वाक्याच्या आधी आणि नंतर ` वापरणे आवश्यक आहे.

News Title : WhatsApp launches four text formatting options

 महत्त्वाच्या बातम्या-

रकुलप्रीत सिंह आणि जॅकी भगनानी अडकले लग्नबंधनात; अभिनेत्रीचा लेहेंगा होतोय प्रचंड व्हायरल

राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी! माजी राज्यपालांच्या घरावर सीबीआयचे छापे

दिलासादायक! केंद्र सरकारने 5 कोटी शेतकऱ्यांना दिली मोठी भेट

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींना पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात

जरांगेंच्या ‘त्या’ मागणीबाबत सरकारमधील मंत्र्यांचा मोठा खुलासा!