मुंबई | अभिनेता रणबीर कपूर त्याच्या दर्दी अभिनयामुळे नेहमी चर्चेत असतो. रणबीर कपूरला फिल्म इंडस्ट्रीचा चाॅकलेट बाॅय म्हणून देखील ओळखलं जातं. आता वेगळ्याच कारणामुळे तो चर्चेत आला आहे.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि अनेक मोठ्या अभिनेत्रींसोबत देखील काम केलं आहे.
रणबीरने सावरिया, जे जवानी हे दिवानी, राॅकस्टार, वेक अप सीड, तमाशा, बर्फी, जग्गा जासूस, अजब प्रेम की गजब कहानी, ये दिल है मुस्किल, राजनिती, अंजाना अंजानी, संजू असे हिट अनेक चित्रपट दिले आहेत.
बाॅलिवूड चित्रपटांसाठी इमोशनचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. रणबीर कपूरने इम्तियाज अलीच्या रॉकस्टार आणि तमाशामध्ये काम केले आहे. तमाशा या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होती.
अशातच प्रसिद्ध चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांनी हा खुलासा केला आहे. अलीकडेच इम्तियाज अली यांनी हिंदुस्तान टाइम्स या इंग्रजी वेबसाइटशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
या चित्रपटाची कथा स्वप्नं आणि पॅशनवर आधारित होती, जी अनेक चढ-उतारांमधून जाते, हीच गोष्ट अनेकांना भारवून गेली. त्यामुळे अनेक लोकांनी नोकरी सोडून पॅशनला पसंती दिली.
तमाशा हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक लोक त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी इम्तियाज अली यांना तमाशा चित्रपट पाहिल्यानंतर नोकरी सोडल्याचं सांगितलं, असं इम्तियाज अलीने सांगितलं आहे.
मी त्यांना सांगतो बॉस, तुम्ही निवडलेल्या प्रोफेशनमध्ये खरचं चांगलं करा, असा सल्ला देखील अलीने भेटायला आलेल्या लोकांना त्यावेळी दिला होता.
तमाशा चित्रपटात आपली खरी ओळख लपवून आयटी सेक्टरमध्ये मन मारून काम करणाऱ्या वेधची गोष्ट आहे. मस्ती, दोस्ती आणि प्रेम असा तडखा या चित्रपटात पहायला मिळतो. रणबीरने या चित्रपटात मन वेधून घेणारी भूमिका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळताच निलेश राणेंचा न्यायालयाबाहेर राडा, पोलिसांशी बाचाबाची
Budget 2022 | मोदी सरकारने महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात केल्या ‘या’ 3 मोठ्या घोषणा
Budget 2022 | मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?, जाणून घ्या एका क्लिकवर
क्रिप्टोकरन्सी विकत घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; मोदी सरकारने केली मोठी घोषणा
Budget 2022 | विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात मोदी सरकारने केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा