…या कारणामुळे मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केले स्थगित

Maratha Aarkshan News l इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गात आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील मराठा समाज सक्रियपणे आंदोलन करत आहे. अशातच मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. 3 मार्चपर्यंत मराठा आंदोलन स्थगित करण्यात येत आहे. या काळात केवळ शांततापूर्ण आंदोलने करण्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे. मात्र मनोज जरांगे यांनी अचानकपणे आंदोलन का स्तहगीत केले असा प्रश्न सर्वानाच पडला असेल तर आता यामागचे कारण समोर आले आहे. मनोज जरांगे यांनी आंदोलन पुढे ढकलण्यामागे परीक्षांचे कारण दिले आहे.

Maratha Aarkshan News l मी 10 टक्के आरक्षण स्वीकारणार नाही : मनोज जरांगे

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे त्यांच्या मागणीवर अद्यापही ठाम आहेत. छत्रपतींवर संभाजीनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, दडपशाही सुरू आहे, अंतरवाली सराटीतील मंडप हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी मंडप न हटवावा, ग्रामस्थांवर होणारे अत्याचार थांबवावेत अशी विनंती केली आहे. (Maratha Aarkshan News)

तसेच याबाबद्दल अधिक माहिती देताना जरांगे पाटील म्हणाले की, “मी 10 टक्के आरक्षण स्वीकारणार नाही, मला अटक करून तुरुंगात टाकले तरी मी पद सोडणार नाही.” मी तुरुंगातही आमरण उपोषण करणार आहे. तसेच ओबीसींचे आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही.

Jalna District Curfew l अंबड शहरातील संचारबंदी उठवली; जिल्हा प्रशासनाने दिली माहिती

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर गृहविभागाने 26 फेब्रुवारीला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली होती. मात्र आता अंबड तालुक्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस प्रशासनाने लागू केलेली संचारबंदी मध्यरात्री 12 वाजता शिथिल केल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे शहर वगळता तालुक्यातील ग्रामीण भागात ही लागू केलेली संचारबंदी कायम असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

News Title : Manoj Jarange Patil suspended the protest

महत्त्वाच्या बातम्या – 

तुम्हाला माहितीये का? भारतात अजूनही किती लोक इंटरनेट वापरत नाहीत? आकडेवारी वाचून थक्क व्हाल

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे होणार जमा

तापसी पन्नू ‘या’ दिग्गज खेळाडू सोबत करणार लग्न

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींनी मोहाला बळी पडू नये

जरांगेंच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा?; राजेश टोपेंच्या ‘त्या’ वक्तव्याने एकच खळबळ