विशेष अधिवेशनात मराठा समाजाला ‘इतके’ टक्के आरक्षण मिळणार!

Maratha Reservation l आज मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे विशेष अधिवेशन सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. या विशेष अधिवेशनात अत्यंत महत्वाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी तीन महत्वाच्या मागण्या सरकारकडे केल्या आहेत. (Maratha Reservation Special Assembly session)

Maratha Reservation l मराठा समाजाला ‘इतके’ टक्के आरक्षण मिळणार :

तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार मराठ्यांना 10 टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत गेल्या महिन्यात अध्यादेश जारी करण्यात आला होता. यानंतरही शासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करत मनोज जरंगे पाटील हे 10 फेब्रुवारीपासून त्यांच्या मूळ गावी जालना येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधी देखील अनेकदा मराठ्यांना आश्वासने दिली आहेत. इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना कोटा देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी सोमवारी पुण्यात केला आहे.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे (MSBCC) अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी शुक्रवारी (16 फेब्रुवारी) मराठ्यांच्या मागासलेपणाची पडताळणी करणारा त्यांचा सर्वसमावेशक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन होत आहे. (Maratha Reservation Special Assembly session)

Maratha Reservation l या आहेत मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्या :

1) सगेसोयरे कायदा : राज्य सरकारने आज बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सगेसोयरे अध्यादेशाचे रुपांतर कायद्यात करून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केली आहे.

2) मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत : राज्यभरात बऱ्याच ठिकाणी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने अंतरवाली सराटीसह राज्यातील मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केली आहे.

3) कुणबी नोंदी ग्रामपंचायतवर लावण्याची मागणी : सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्या गावात कुणाची नोंद सापडली यासंदर्भातील माहिती गावकऱ्यांना आणि संबंधित व्यक्तीला मिळावी यासाठी प्रत्येक गावात सापडलेल्या नोंदी त्या गावाच्या ग्रामपंचायतवर लावण्याची मागणी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केली आहे.

News Title  : Maratha Reservation Special Assembly session

महत्वाच्या बातम्या :

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींना व्यापारातून चांगला लाभ होईल

लवकरच बाजारात येणार या दोन कार; पाहा फीचर्स आणि इतर माहिती

ऑनलाईन शॉपिंग करताय तर या गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

चुकूनही हे 4 व्यवहार करू नका, नाहीतर तुम्हाला येईल डायरेक्ट नोटीस

नियमित या सवयी लावा चष्माच्या समस्येपासून सुटका मिळवा!