पुणेकरांनो! रात्री हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी पोलिसांची नवी नियमावली एकदा वाचाच

Pune Police Rules For Hotels Pubs l गेल्या काही दिवसांपासून पुण्यात भरदिवसा गोळीबार, कोयता गॅंग यांसह विविध गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सतत वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र पुण्याची वाढती गुन्हेगारी लक्षात घेता राज्य सरकारने पुण्याचा कारभार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर सोपवला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी पुण्यात नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी चांगलेच ऍक्शन मोडवर आले आहेत. (Pune Crime News)

Pune Police Rules For Hotels Pubs l पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी उचललं मोठं पाऊल :

अशातच आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक मोठं पाऊल उचललं आहे. पुणे शहरात पब नाईटलाईफचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे पुणे शहरातील तरुणांचा रात्रीचा धिंगाणा थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहरातील हॉटेल आणि पब यांच्यासाठी पोलिसांनी एक नियमावली तयार केली आहे.

आयुक्तांनी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार मध्यरात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल आणि पब व्यवसायास परवानगी देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. जर पोलीस आयुक्तांनी जाहीर केलेल्या नव्या नियमावलीचे पालन न करता हॉटेल उशिरापर्यंत सुरु ठेवल्यास व पब सुरू ठेवल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

पोलिसांनी केलेल्या सूचना कोणत्या? (Pune Police Rules For Hotels Pubs) :

1) जर हॉटेलमध्ये बाहेरील कलाकार येणार असल्यास किंवा डीजे येणार असल्यास त्याची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे.

2) स्वच्छतागृह सोडून हॉटेलमध्ये सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे.

3) हॉटेलमध्ये प्रवेशद्वारावर व बाहेर पडण्याच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे असणे बंधनकारक आहे.

4) सीसीटीव्ही चित्रीकरणातील डेटा साठविण्यासाठी दोन डीव्हीआर यंत्रे असणे बंधनकारक आहे.

5) हॉटेलमधील कर्मचारी, सुरक्षारक्षकांची चारित्र्यपडताळणी करणे बंधनकारक आहे.

6) जर एखाद्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल असल्यास त्याला कामावर ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्तांची परवानगी आवश्यक असणार आहे.

7) हॉटेलमध्ये धुम्रपानासाठी स्वतंत्र जागा असणे बंधनकारक आहे. (Pune Crime News)

News Title : Pune Police Rules For Hotels Pubs

महत्वाच्या बातम्या :

विशेष अधिवेशनात मराठा समाजाला ‘इतके’ टक्के आरक्षण मिळणार!

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींना व्यापारातून चांगला लाभ होईल

लवकरच बाजारात येणार या दोन कार; पाहा फीचर्स आणि इतर माहिती

ऑनलाईन शॉपिंग करताय तर या गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

चुकूनही हे 4 व्यवहार करू नका, नाहीतर तुम्हाला येईल डायरेक्ट नोटीस