तरूणांना नोकरीची सुवर्णसंधी; ‘ही’ दिग्गज IT कंपनी देणार 55 हजार जणांना नोकरी

नवी दिल्ली | देशातील तरूणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. कारण देशातील सर्वात मोठी IT कंपनी असलेल्या इन्फोसिसमध्ये तब्बल 55 हजार लोकांची नवीन भरती होणार आहे.

भरतीमध्ये आभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेच्या पदवीधारकांना संधी मिळणार असल्याचं कंपनीचे सीईओ पारेख यांनी सांगितलं आहे. आयटी उद्योग लॉबी नॅसकॉमच्या वार्षिक NTLF कार्यक्रमाला सीईओ पारेख यांनी संबोधित केलं.

सीईओ पारेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2022 साठी 55 हजार नवीन लोकांना इन्फोसिसमध्ये संधी देण्यात येणार आहे. वर्ष 2023 मध्ये यापेक्षा जास्त लोकांची भरती करू अशी माहिती सीईओ पारेख यांनी यावेळी दिली.

इन्फोसिसमध्ये आर्थिक वर्ष 2022 मध्ये वार्षिक महसुलात 20 टक्के वाढ करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. कंपनीमध्ये त्यामुळेच नवीन व्यक्तींना सहभागी होण्याची संधी देण्यात येत आहे.

नवीन भरती झालेल्या उमेदवारांना 6 ते 12 आठवड्यांपर्यंत प्रशिक्षण देण्यात येतं, अशी माहिती सीईओ पारेख यांनी दिली आहे. प्रशिक्षित भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना दहा वर्षांत स्वत:च्या कौशल्यात वाढ करावी लागणार आहे.

दरम्यान, तंत्रज्ञान सतत बदलत असल्याने तरूण पदवीधरांनी दर तीन ते पाच वर्षांनी स्वत:च्या कलागुणांना वाव देत वीनन कौशल्य प्राप्त केलं पाहिजे.

ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक क्लाउड, खासगी क्लाउड आणि प्लॅटफॉर्मला सेवा कार्य म्हणून एकत्रित करू शकते असे सीईओ पारेख यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

तुमची लाडकी Wagon R येतेय नव्या रूपात; जाणून घ्या फिचर्स 

 “शिवसेना 2024 पर्यंत दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेली असेल, तेव्हा…

“…नाहीतर आम्ही काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला नसता”

Bappi Lahiri | ‘या’ आजारामुळे बप्पी लाहिरी यांचं निधन झालं; तुम्हीही वेळीच काळजी घ्या

“संजय राऊतांना घाम का फुटला? त्यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर”