मेधा पाटकरांच्या उपोषणाचा सलग 9वा दिवस; प्रकृती खालावली

बडगाम : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी नर्मदा धरणामुळे विस्थापित झालेल्या मागण्यांसाठी 25 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र, सरकार आणि प्रशासनाकडून अजून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने त्यांचं 9 दिवसापासून उपोषण सुरूच आहे. शनिवारी त्यांची प्रकृती खालावली.

मेधा पाटकर यांनी पाणी पिण्यासही नकार दिला. मध्य प्रदेशमधील बडवानी जिल्ह्यात छोटा बड्डा गावात हे उपोषण सुरू आहे. मेधा पाटकर यांच्यासोबत त्यांचे शेकडो सहकारी देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. ते नर्मदा नदीवरील  धरणामुळे विस्थापित झालेल्या 32 हजार लोकांच्या मागण्यांसाठी लढत आहेत.

पाटकर यांच्या उपोषणानंतर जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत उपोषण सोडण्याचं आवाहन केलं. मात्र, मेधा पाटकर यांनी विस्थापित नागरिकांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण सोडण्यास नकार दिला.
अनेक गावं पाण्याखाली

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर मागील 34 वर्षांपासून ‘नर्मदा बचाओ आंदोलना’च्या माध्यमातून नर्मदा नदीवरील धरणाने विस्थापित झालेल्या नागरिकांच्या न्याय-हक्कासाठी लढा देत आहेत. नर्मदा नदीवरील धरणामुळे नदी परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने पाटकर यांनी धरणाची उंची वाढवण्यास सातत्याने विरोध केला आहे.

धरणाची उंची वाढवल्यास त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसेल. त्यामुळे अनेक कुटुंब विस्थापित होतील, उद्ध्वस्त होतील, अशी त्यांची भूमिका राहिली आहे. धरणातील पाण्याचा स्तर वाढल्यानंतर त्याचा प्रत्यय अनेकदा पाहायला मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या-