नागपूर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकारच्या कामाच्या पद्धतीवर बोलताना त्यांनी सरकार जिथं हात लावतं, तिथं सत्यानाश होतो, असं मत व्यक्त केलं. ते नागपूरमध्ये मदर डेअरी कार्यक्रमात बोलत होते.
वामन पै यांनी तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे हा संदेश दिला होता. तेव्हापासून मी कधीही सरकारकडे मदतीला जात नाही. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार या ध्येय्यावर मी चालतो, असं गडकरींनी सांगितलं आहे.
मी माझ्या कोणत्याही प्रकल्पासाठी सरकारकडे मदत मागत नाही. मदत तर दूर पण आपल्याकडं सरकार जिथं हात लावतं तिथं सत्यानाशच होतो, असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे.
सरकारने काही चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक पण करतो. मात्र, मी कधीही सरकारकडं मदत मागायला जात नाही, असं नितीन गडकरींनी सांगितलं आहे.
शिव ठाकरे ठरला ‘बिग बॉस मराठी 2’चा विजेता – https://t.co/kGZ20pvBdO @Shiv_Thackre #BigBossMarathi2
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019
आबा तुम्ही माझं ऐकलं असतं तर…- शरद पवार https://t.co/Ck93pgYzUM @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019
अमित शहांचा शरद पवारांवर घणाघात; म्हणतात… – https://t.co/GeDaD7X2H0 @AmitShah @PawarSpeaks @BJP4Maharashtra @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019