मराठा आरक्षणाच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत वाद; वाचा इतिवृत्त

मुंबई | मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सक्रिय आहेत. काल (दि. 25) रोजी सह्याद्री अतिथिगृहात बैठक पार पडली.

यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिवछत्रपती संघटनेचे नेते अमर देशमुख (Amar Deshmukh) आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर माध्यमांसोबत संवाद साधताना अमर देशमुख यांनी संताप व्यक्त केला.

जसे पहिल्या मुख्यमंत्र्यांकडे बडवे होते, तसे आताच्या मुख्यमंत्र्यांकडे देखील बडवे आहेत. मराठा समाजाची बैठक बोलावली तर शेवटच्या घटकाला देखील बोलता आले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

मराठा आरक्षणाच्या मु्द्द्यावरुन सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत काहीही चर्चा झाली नसून त्यात या बैठकीवर आपण समाधानी नसल्याचे मत अमर देशमुख यांनी मांडले. त्यांनी यावेळी शासनाबद्दल त्यांनी राग व्यक्त केला.

यावेळी सर्वांना बोलण्याची संधी मिळाली नाही, अशी तक्रार देखील देशमुखांनी केली. या बैठकीत भाजपच्या नेत्यांनी आणि शिंदे यांच्या जवळच्या नेत्यांनी आपली मते मांडली, असे देशमुख म्हणाले.

जे जुने नेते आहेत, ते भाजपसोबत लांगूनचालन करतात, त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा कार्यक्रम या बैठकीत झाला. तसेच शेवटच्या कार्यकर्त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचला नाही.

त्यांनी बैठकीची कोणतीही रुपरेषा ठरवली नाही. केवळ दिखाव्यासाठी बैठक बोलावली आणि पहिल्या फळीतील लोकांना बोलण्याची संधी दिली. त्यामुळे ही बैठक कुचकामी ठरली, असा देशमुखांनी सूर लावला.

शिवछत्रपती संघटनेच्या (Shivchatrapati Sanghatana) अमर देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा मराठा मोर्चाअंतर्गत आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. तसेच येणाऱ्या काळात त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बैठक घ्यावी आणि आम्हाला बोलण्याची संधी द्यावी, अशी विनंती केली.

महत्वाच्या बातम्या –

IPS कृष्ण प्रकाश यांची आईच्या निधनावर भावूक पोस्ट “तुझ्याशिवाय मी काहीच नाही”

तब्बल 15 दिवसांनी राजू श्रीवास्तव शुद्धीवर आले, त्यांनी शुद्धीवर येताच म्हंटले…

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबाबत विधानसभेत मोठा निर्णय

बिल्कीस बानो प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाची गुजरात सरकारला नोटीस

पेगासस हेरगिरीचा न्यायालयात अहवाल सादर; महत्वाची माहिती समोर