महाराष्ट्र मुंबई

चित्रा वाघ आणि सचिन अहिर यांच्या राजीनाम्यावर मेहबूब शेख यांची आक्रमक प्रतिक्रिया!

मुंबई |  राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि प्रदेशाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचे पक्षात पडसाद उमटत आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी यावर खंत व्यक्त केली आहे. परंतू यापुढे आम्ही असे कार्यकर्ते तयार करू जे पक्षाचा मान ठेवतील. पक्षाच्या संघर्षाच्या काळात पक्षात सोबत असतील, असं म्हटलं आहे.

मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्या राजीनाम्यावर नाराजी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हौसला बुलंद केला आहे.

मेहबूब शेख यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया-

इस तरह कौमों का मुकद्दर नही बनता… बारीश में भी तालाब समंदर नही बनता… हो जाते हैं कुछ लोग इकट्टा तो ऐ दोस्त, कहेते है उसे भीड…. वो लष्कर नही बनता!

दुसरीकडे सचिन अहिर यांना देखील मेहबूब यांनी लक्ष्य केलं आहे. पवार साहेबांच्या विचारांवरती आणि राष्ट्रवादीवर ज्यांचं प्रेम आणि निष्ठा नाही, अशा संधीसाधू कार्यकर्त्यांची आम्हाला गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

ज्यांना जायचंय त्यांनी जावं… राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांच्या मतदारसंघात ताकदीने काम करेल आणि त्या मतदारसंघात राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून येईल याचा प्रयत्न करेल, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-‘होय, मी शरद पवार साहेबांच्या सोबत आहे…; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सोशल मीडियावर मोहीम

-या 20 दिग्गज नेत्यांनी पवारांची साथ सोडली तर हे 9 जण धक्का देण्याच्या तयारीत!

-महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड

-काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते म्हणतात वंचितबरोबर चर्चा सुरू; प्रकाश आंबेडकर म्हणतात…

-…भाजपवाल्यांनो हे फार काळ टिकणार नाही- सुशीलकुमार शिंदे

IMPIMP