उन्हाळा वाढतोय काळजी घ्या! येत्या 48 तासात राज्याच्या ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार

मुंबई | उन्हानं आता सर्वांच्या अडचणीत भर टाकायला सुरूवात केली आहे. सर्वत्र सध्या तापमानाचा पारा वाढत असल्याचं दिसत आहे.

उन्हाळा आला की डाॅक्टर अनेक उपाय सुचवत असतात. उन्हाचा घातक परिणाम सर्वांच्या आरोग्यावर होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.

काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

येत्या 48 तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. परिणामी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

नागरिकांना उष्माघाताचा त्रास देखील होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी दिवसभरात भरपूर प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला डाॅक्टर देत आहेत.

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाच क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढील काही काळात हे क्षेत्र ईशान्य आणि मध्य भारतात धडकण्याची शक्यता आहे.

हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर चक्रीवादळात झाल्यास उष्णतेत वाढ होणार आहे. वाढत्या तापमानाच्या झळा विदर्भ आणि खान्देशाला बसणार आहेत.

राज्यात सध्या अनेक जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअसच्या पुढ पारा गेला आहे. येत्या काही दिवस तरी उष्णतेत अशीच झपाट्यानं वाढ होणार आहे.

पाहा ट्विट – 

 

महत्त्वाच्या बातम्या – 

 “महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात”, भाजपच्या दाव्यानं राज्यात खळबळ

 बंपर ऑफर! होळीनिमित्त Hondaच्या गाड्यांवर मिळणार तब्बल 25 हजारांचा डिस्काऊंट

 ‘संपूर्ण जगात याची चर्चा होणार’; करूणा शर्मा यांची मोठी घोषणा

जिओकडून नव्या प्लॅनची घोषणा, अनलिमिटेड कॉलिंगसह नेटही मिळणार! 

कोरोनाचा विस्फोट होऊ लागल्यानंतर मोदी सरकारचा राज्यांना अलर्ट, म्हणाले…