‘या’ कारणामुळे मिलिंद देवरांनी केलं मोदींचं कौतुक

मुंबई | राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. ह्यूस्टनमधलल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमादरम्यान मोदींनी केलेल्या भाषणाचं त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून कौतुक केलं आहे. देवरांच्या ट्वीटची दखल घेत मोदींनीही देवरांचे आभार मानले.

मोदीजी भारताच्या सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी दाखवून दिला.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आदरातिथ्य आणि त्यांनी भारतीय अमेरिकन नागरिकांच्या योगदानाची ठेवलेली जाण, याचा आम्हाला अभिमान वाटतो, असं देवरांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मोदीजी तुम्ही अगदी बरोबर आहात. माझे वडील मुरली देवरा यांची अमेरिकेसोबतच्या दृढ संबंधांसाठी आग्रही होते. दोन राष्ट्रांमधील संबंध गहिरे होत असल्याचं पाहून त्यांना खरोखर आनंद झाला असता, असं देवरांनी म्हटलं आहे.

पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन पंतप्रधानांचं कौतुक केल्याबद्दल केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरेन रीजिजू यांनीही देवरांचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, संजय निरूपम आणि मिलिंद देवरा याच्यातला वाद सर्वांना माहित असल्याने ते  काँग्रेसला सोडचिठ्ठी देत  भाजपच्या वाटेवर आहेत का? अशा चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत.

मिलिंद देवरा  यांचं ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-