Budget 2022 | केंद्रीय अर्थमंत्री आज अर्थसंकल्प सादर करणार; अर्थव्यवस्थेला गती मिळणार?

नवी दिल्ली | संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) आज सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) या आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

संसदेचं 2022 चं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. हे अधिवेशन 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. मध्ये एक महिना सुट्टी असेल. त्यानुसार सत्राचा पहिला भाग 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी असा असेल. पुढे महिनाभराच्या विश्रांतीनंतर सत्राचा दुसरा भाग 14 मार्चपासून सुरु होऊन 8 एप्रिलला संपणार आहे.

कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारचे प्राधान्यक्रम काय असतील आणि त्यात नोकरदार आणि सर्वसामान्यांना काय मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आज सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 9 वाजता आपल्या टीमसोबत अर्थमंत्रालयातून राष्ट्रपती भवनात जाण्यासाठी रवाना होतील. वित्त मंत्रालयाच्या महासंचालकांनी दिलेल्या (मीडिया आणि कम्युनिकेशन्स) माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाला अर्थसंकल्पाची थोडक्यात माहिती देतील आणि त्यानंतर संसदेकडे रवाना होतील.

प्रस्थापित परंपरेनुसार, भारताच्या राष्ट्रपतींना सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती दिली जाते. केंद्रीय अर्थसंकल्पात राष्ट्रपती कोणतेही बदल सुचवत नसल्यामुळे ही बैठक नेहमीचीच असते. परंतु संसदेत अधिकृतपणे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्र्यांना राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते.

राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षेत मंत्रिमंडळाला संक्षिप्त स्वरुपात अर्थसंकल्पाबाबत माहिती देतात.

अर्थ मंत्रालयाकडून अर्थसंकल्पाबाबत गोपनियता पाळली जाते. अर्थमंत्र्यांनी आपलं भाषण सादर करण्यापूर्वी अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत गुप्तता राखणं बंधनकारक असतं.

महत्वाच्या बातम्या- 

“राहुल गांधींचं पाकिट कुणी मारलं?”; माजी केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ 

 जगभरात NeoCoV व्हायरसची दहशत; तज्ज्ञांनी दिली अत्यंत धक्कादायक माहिती

 ओमिक्रॉनमधून नीट झाल्यानंतर दिसतात ‘ही’ लक्षणं, अजिबात दुर्लक्ष करू नका

Budget 2022: बजेट म्हणजे नक्की काय असतं? तुम्हाला काय फायदा होतो? वाचा सविस्तर

“लीडर होण्यासाठी कर्णधार असणं गरजेचं नाही”, अखेर किंग कोहलीने सोडलं मौन