मुंबई | महाराष्ट्र सरकारने कोरोनाची नवीन नियमावली जाहीर केली आहे. एक फेब्रुवारीपासून नवीन नियमावली लागू होणार आहे. अपेक्षेनुसार, निर्बंधामध्ये सूट देण्यात आली आहे. पण सूट देण्यात आलेल्या ठिकाणी जायचे असेल तर लसीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे.
मंगळवारपासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
अंत्यसंस्काराठी 20 व्यक्तींची मर्यदा हटविण्यात आली असून आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल. अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने, उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत 50 टक्के क्षमतेने.
मनोरंजनात्मक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने, खुल्या मैदानात किंवा सभागृहात क्षमतेच्या 25 टक्के किंवा 200 लोकांना प्रवेश देण्यात आला आहे.
नॅशनल पार्क आणि जंगल सफारी आधीप्रमाणे नियमीत वेळवर सुरु होतील. येथे भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. तसेच मास्कही वापरण्यात यावा. दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी ऑनलाईन तिकिट बूक करावं लागेल.
दरम्यान, जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकली होती. एवढंच नाहीतर ओमायक्रॉनचा समूह संसर्ग सुरू झाला होता. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली होती.
राज्यात सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. पण, उद्या 1 फेब्रुवारी 2022 पासून कोविड संसर्ग रोखण्यासंदर्भातील राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सुधारित आदेश जारी करण्यात आले आहे. 8 जानेवारी रोजी जे निर्बंध लागू करण्यात आले होते, ते आता हटवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Budget 2022 | केंद्रीय अर्थमंत्री आज अर्थसंकल्प सादर करणार; अर्थव्यवस्थेला गती मिळणार?
“राहुल गांधींचं पाकिट कुणी मारलं?”; माजी केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ
जगभरात NeoCoV व्हायरसची दहशत; तज्ज्ञांनी दिली अत्यंत धक्कादायक माहिती
ओमिक्रॉनमधून नीट झाल्यानंतर दिसतात ‘ही’ लक्षणं, अजिबात दुर्लक्ष करू नका
Budget 2022: बजेट म्हणजे नक्की काय असतं? तुम्हाला काय फायदा होतो? वाचा सविस्तर