मुंबई | हनुमान चालीसा आणि भोंगे या विषयावरून राज्यासह देशात सध्या मोठा वाद होत आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राण यांनी हनुमान चालीसावरून सरकारला धारेवर धरलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानसमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा अट्टहास केल्यामुळं त्यांना न्यायालयीन लढ्याला देखील सामोरं जावं लागलं होतं.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसनं अप्रत्यक्ष मदत केल्यामुळं नवनीत राणा निवडून आल्याचा दावा देखील आघाडीचे नेते करत आहेत.
राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आता नवनीत राणंवर जोरदार टीका केली आहे. अमरावती शहरातील वातावरण बिघडावण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप ठाकूर यांनी केला आहे.
एका पक्षाच्या पाठिंब्यावर निवडून यायचं आणि दुसऱ्या सत्तेत आलेल्या पक्षाची चाकरी करायची हा प्रकार नवनीत राणा करत आहेत, अशी जहरी टीका ठाकूर यांनी केली आहे.
हनुमान चालीसावरून जोरदार राजकारण पेटलेलं असताना आता ठाकूर यांच्या वक्तव्यानं वादाला नवं वळण मिळालं आहे. परिणामी ठाकूर यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.
दरम्यान, राणा दाम्पत्यानं सध्या भाजपच्या बाजून बोलायला सुरूवात केल्यानं अमरावतीत आघाडीच्या पाठिंब्याला काही अर्थ उरला नसल्याची चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
गुजरातमध्ये काँग्रेसला जोर का झटका; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा
सहाव्या राज्यसभा जागेवरून संजय राऊतांचा इशारा, म्हणाले…
“जगू द्याल की नाही?”; राज ठाकरेंचा संतप्त सवाल
संभाजीराजेंचा राज्यसभा मार्ग खडतर?, शिवसेनेनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल
अण्णा हजारेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, दिला ‘हा’ गंभीर इशारा