करिअरच्या उंच शिखरावर असताना ‘या’ कारणामुळे झाला होता इंडस्ट्रीतून गायब, जाणून घ्या हनी सिंगच्या खडतर प्रवासाबद्दल

प्रसिद्ध गायक-रॅपर ‘यो यो हनी सिंग’ 38 वर्षाचा पूर्ण झाला आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की हनी सिंगचे खरे नाव हिरदेश सिंग आहे. पण जेव्हा त्याने स्टेजवर परफॉर्म करायला सुरुवात केली तेव्हा त्याने आपले नाव यो यो हनी सिंग ठेवले. हनी सिंगने आपल्या करिअरची सुरुवात यूट्यूब व्हिडीओने केली होती त्यानंतर तो एका रात्रीत स्टार झाला.

1983 साली पंजाबमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल आज यशाच्या शिखरावर असलेला हनी सिंग करिअरच्या सुरुवातीस चक्क एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करत होता.

गायक, रॅपर, प्रोड्युसर, कंपोजर, पाॅपसिंगर, अभिनेता आणि गीतकार अशा अनेक भूमिका हनी सिंग अगदी चोखपणे सांभाळतो. हनीला त्याच्या गाण्यांनी आणि म्युझिकनं खूप लोकप्रियता मिळवून दिली आहे. मात्र हनी सिंगचा वाटतो तितका प्रवास सोपा नव्हता. अनेक चढउतार, अनेक संघर्ष करत त्यानं एवढं नाव कमवलं आहे.

‘शकल पे मत जा’ या गाण्याने हनीने डेब्यू केला. ज्यानंतर त्याला कधीही मागे वळून पहावे लागले नाही. त्याचे प्रत्येक गाणे सुपरहिट ठरले. पण एक वेळ असा आला होता की, हनी आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर होता आणि अचानक इंडस्ट्रीमधून गायब झाला.

याविषयी बोलताना हनी सिंग म्हटला की, मी बायपोलर डिसऑर्डरने पीडित होतो. बायपोलर डिसआर्डरनं जवळपास 18 महिने पीडित होतो.’ ‘ते 18 महिने माझ्या जीवनातील सर्वात वाईट काळ होता. हनी म्हणाला की, ‘मी बायपोलरच्या आजारासोबत दारूही पित होतो. ज्यामुळे माझी अवस्था आणखीन बिघडली.

एक वेळ असा होता की मी यातून कधीच बाहेर पडणार नाही, असे हनीला वाटत होते. त्याच्यावर औषधांचादेखील फरक पडत नव्हता.त्याने पुढे सांगितले की, ‘एका रात्री जेव्हा मी झोपेच्या गोळ्या खाल्यानंतरही झोपलो नाही. त्यावेळी मी राइज अँड शाइन नावाचे गाणे लिहिले आणि कंपोझ केले. हे सर्व पाहून माझी आई रडली होती. या कारणामुळेच मी आज त्या आजारातून बाहेर पडू शकलो.

सुरुवातीला एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये त्याला भांगडा प्रोड्युसर म्हणून काम मिळालं होतं. या कामासाठी त्याला केवळ 2 हजार रुपये पगार मिळत होता. त्यामुळं तो अनेकदा ऑफिसमध्येच झोपायचा आणि रस्त्यावर मिळणारं अन्न खावून दिवस काढायचा.

पुढे हळूहळू त्यानं पैसे जमा केले व मुंबईतील वांद्रे येथे एक फ्लॅट भाड्यानं मिळवलं. या ठिकाणी तो आपल्या आणखी दोन मित्रांसोबत राहयचा. त्यांच्या मदतीनं त्यानं काही गाणी रेकॉर्ड केली अन् ती गाणी घेऊन तो म्युझिक कंपन्यांकडे जायचा.

2005 साली त्यानं पेशी या म्युझिक अल्बमची निर्मिती केली होती. हा अल्बम थंडर या म्युझिक कंपनीला आवडला. अन् त्यांनी या अल्बमच्या ब्रॉडकास्टिंगची जबाबदारी स्विकारली. हा अल्बम सुपरहिट झाला. परिणामी हनी सिंगला रातोरात प्रसिद्धी मिळाली.

 

 

महत्वाच्या बातम्या –

‘या’ भाजप नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

जाणून घ्या! तांदळाच्या पाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

व्हायचं होतं पत्रकार झाला अभिनेता, वाचा ‘या’ अभिनेत्याचा किस्सा

वाढदिवसाच्या दिवशी आमिर खानचा सोशल मीडियाला रामराम, शेअर केली ‘ही’ शेवटची पोस्ट

तिनं तरुणाला खुलेआम प्रपोज केलं, पण चांगलंच महागात पडलं; पाहा व्हिडीओ