“भाजपवाल्यांनो सावधान, उद्या हे स्वत: ला नरेंद्र मोदी समजून पंतप्रधानपदावरही दावा करतील”

मुंबई | शिवसेनेतील बंडानंतर बंडखोरांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मूळ शिवसेना पक्षावर दावा ठोकला. कारण शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आणि खासदार सध्या शिंदे गटात आहेत. त्यामुळे खरी शिवसेना आमच्याकडे असल्याने आता आम्हाला शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मिळावं यासाठी सुद्धा त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे.

त्यानंतर त्यांनी संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयावर देखील दावा केला. त्यानंतर शिवसेना भलतीच संतापली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदारांना दोन आव्हाने केली आहेत.

एक म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा फोटो न वापरता आणि त्यांचं नाव न घेता निवडून या आणि दुसरे तुमचे आईवडिल जीवंत आहेत ना, मग त्यांचे फोटो लावून मते मागा. माझ्या वडिलांचा फोटो वापरणे बंद करा, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. त्यावर आता शिवसेनेेने परत शिंदे आणि बंडखोर गटाला टोला लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना दिलेल्या मुलाखतीचा उर्वरीत भाग आज (दि. 26) रोजी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये छापून आला आहे.

त्यात उद्धव ठाकरे म्हणतात, प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. भाजपवाल्यांनो सावधान, उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्र मोदी (Narendra Modi) समजतील आणि पंतप्रधान पदावर दावा सांगतील शेवटी लालसा ही अशी घाणेरडी गोष्ट असते की, तीची चटक लागते.

आम्ही 2014 च्या भाजप-शिवसेना (BJP Shivsena Government 2014) युती सरकारमध्ये असताना हेच लोक मला येऊन शिवसैनिकांना भाजप कसं त्रास देतो? म्हणून एकनाथ शिंदे यांनी भरसभेत पदाचा राजीनामा देणारे पत्र मला दिले होते. त्यावेळी त्यांना भाजपकडून त्रास होत होता. आणि आता त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करत आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.

भाजपने 2019 साली खोटेपणाचा कळस केला. त्यांनी निवडणुकीअगोदर दिलेले शब्द पाळले नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा (MVA) जन्म झाला. तर आता यांना काँग्रेस (INC) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) त्रास देतात. मग तुम्हाला हवंय तरी काय?, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या –

“बाळासाहेबांच्या पोटी आलात म्हणजे काही राजा झालात का?” 

‘उद्धव ठाकरे दोन वेळा घरातून पळून गेले होते’, नारायण राणेंचा गौप्यस्फोट

“काय ते प्रश्न.. काय ती उत्तरं.. काय तो घरगुती कार्यक्रम.. एकदम ओक्के”

“उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच आहे”

“तुमच्यात कर्तृत्व नाहीये, तुम्ही मर्द नाहीत, शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका”