मुंबई | देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई अविरतपणे धावत असते. जागतिक दर्जाचं शहर असल्यानं मुंबईला सुरक्षेची सुद्ध तितकीच गरज असते. मुंबईच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचे जवान रात्र-दिवस झटत असतात.
नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येवर मुंबईत मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी वाढते. परिणामी काही विपरीत घटना घडण्याची देखील शक्यता असते. अशातच आता मुंबईच्या दृष्टीनं महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता केंद्रीय तपास यंत्रणांनी वर्तवली आहे. खलिस्तानी संघटना मुंबईमध्ये हल्ले करू शकतात, अशी माहिती केंद्रीय गुप्तचर विभागाला मिळाली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या या माहितीनंतर मुंबई पोलिसांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. साप्ताहिक सुट्टीसह एका आठवड्यातील सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी मुंबई पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था राखण्यावर भर दिला आहे.
मुंबई शहरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरातील सर्व पोलिसांना आपपल्या कार्यक्षेत्रात राहाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत आपल्या जिवाची बाजी लावून मुंबईला सुरक्षित ठेवलं आहे.
मुंबईतील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणांंना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबई पोलिसांनी शहरातील प्रमुख ठिकाणांची पाहणी करण्यास सुरूवात केली आहे. मुंबईतील गर्दी ही नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जास्त असते
मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सुरक्षेचा रेल्वे पोलिसांनी आढावा घेतला आहे. तसेच इतरही सर्व स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त असेल.
मुंबईत उद्या हल्ला केला जाणार अशी माहिती मिळाल्यानं मुंबईत उद्या अतिरिक्त 3 हजार जवान तैनात केले जाणार असल्याची माहिती रेल्वेचे पोलीस आयुक्च क्वेसर खालिद यांनी दिली आहे.
दरम्यान, सर्वांच्या जिवाची मुंबई आपली मुंबई हे ब्रिद वाक्य मुंबईबाबत कायम बोललं जातं. त्या मुंबईनं अनेकदा दहशतवादाचे घाव सोसले आहेत. सुरक्षा दलांनी आपल्या अतुलनीय पराक्रमाच्या जोरावर मुंबई कायम आनंदी ठेवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भाजप खासदार म्हणतात,”नाईट कर्फ्यू आणि लाॅकडाऊन हा बोगसपणा, लग्न समारंभात…”
नाशकात ‘दंगल’… बारकाल्या पोरींची कॉलेजमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ-
मोठी बातमी! नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता
‘…तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावावा लागेल’; गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
नितेश राणे यांना धक्क्यावर धक्के! सहकार विभागाकडून मोठी कारवाई