‘…तेव्हा मराठी कलाकार नाही दिसले त्यावेळी दिशा, जॅकलीनस पाहिजे असतात’; राणेंचं जोरदार टीकास्त्र!

मुंबई |  प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंहच्या प्रकरणावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वादंग चालू आहे. काल सुशांतच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायलयाने दिला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला. याचाच धागा पकडत भाजप आमदार निलेश राणे यांनी सामनाच्या अग्रलेखावर टीका केली आहे.

आता पुढील काही दिवस सामनाचा अग्रलेख हा मराठी अस्मिता, महाराष्ट्र धर्म आणि मराठी माणसावर असणार असल्याचं राणेंनी म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी सरकारला नाई़ट लाईफवरून धारेवर धरलं.

नाई़ट लाईफ करताना यांना मराठी माणूस दिसला नाही आणि मराठी कलाकारही दिसले नाहीत. तेव्हा दिशा, जॅकलीन आणि दिनो पाहिजे असतात. यांना वाट लागल्यावरच मराठी माणूस दिसत असल्याचं म्हणत नितेश राणेंनी राज्य सरकावर टीकेचे बाण सोडले आहेत.

दरम्यान, भाजपकडून महाराष्ट्र सरकारवर टीका सुरु आहे. बिहारमधल्या पोलिसांना मुंबईत क्वारंटाईन केलं म्हणून सुशांत प्रकरणात संशय वाढतो असं कुणाचं निरीक्षण असेल किंवा त्याआधारे तपास सीबीआयकडे दिला असेल तर आज देशाची घटना ही अश्रू ढाळत असेल, असं राऊत यांनी आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“दाभोलकरांना मारण्यात आलं तेव्हा गृहखात राष्ट्रवादीकडेच होतं, तुमच्याच सरकारने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला”

ब्रँड इज ब्रँड! ‘क्रिकेट विश्वाच्या इतिहासात तुझं नाव…’; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माहीला पाठवलं खास पत्र

मुंबई पोलिसांना न्यायाच्या आणि सत्याच्या मार्गावर असताना रोखलं हे बरोबर नाही- संजय राऊत

काय सांगता…! कांदा एवढा लाभदायी आहे; सविस्तर वाचा

रिया आणि सुशांतच्या नात्याची सुरुवात कशी झाली?; रियाने सांगितली ‘लव्ह स्टोरी’