‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी अमित ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई | डॉक्टरांच्या तसेच राज्यातील इतर विविध मागण्यांसाठी मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. अमित ठाकरेंसोबत शालिनी ठाकरे तसंच बाळा नांदगावकर देखील कोश्यारींच्या भेटीसाठी राजभवनात उपस्थित होते.

अमित ठाकरेंनी या भेटीदरम्यान निवासी डॉक्टरांच्या परिक्षा, आशा सेविकांचं मानधन आणि इतर देशात अडकून पडलेले बांधव यांच्याविषयी चर्चा केली. कोरोनाविरोधात लढत असलेले निवासी डॉक्टरांची येत्या 15 जुलै पासून परिक्षा आहेत. यासंदर्भात डॉक्टरांनी सुचवलेल्या पर्यायांचा विचार करावा. त्याचप्रमाणे राज्यातील 72 हजार आशा सेविकांना किमान 10,000 मानधन मिळावं याबाबत राज्यपालांना निवेदन देण्यात आलं.

परप्रांतातून जे मजूर महाराष्ट्रात येतायत त्यांची आंतरराज्यीय स्थलांतर कायद्याद्वारे नोंदणी आणि वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना राज्यात घ्यावं. या पद्धतीचे राज्य सरकारला आदेश देण्यात यावेत अशी मागणी मनसेचे नेते आणि आमदार राजू पाटील यांनी केली. इतर देशांत अडकलेल्या मराठी बांधवांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केली.

दरम्यान, मनसेने मांडलेले सर्व विषय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या सर्व विषयांमध्ये लक्ष देण्याचं आश्वासन राज्यपाल कोश्यारी यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी नसून धुरंधर मोदी आहेत- रामदास आठवले

-कोरोनाविरोधातील लढ्यासाठी बीएमसीचा नवा अ‍ॅक्शन प्लॅन; ‘या’ सहा विभागांमध्ये राबवलं जाणार ‘मिशन झिरो’

-भिवंडीनंतर ‘या’ शहरात 30 जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर

-जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल!

-सुशांत सिंग राजपूतच्या न्यायासाठी करणी सेना लढणार