राज ठाकरेंच्या ‘मुन्नाभाई’ उल्लेखावर मनसेचे प्रत्युत्तर; उद्धव ठाकरेंना दिली ‘या’ कलाकाराची उपमा

मुंबई | राज्यातील राजकारणात शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट, भाजप आणि मनसे असा वाद सुरु झाला आहे. शिवसेनेचे आता तीन पक्ष शत्रू झाले आहेत. तर त्यांच्या शत्रुंची युती झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गटप्रमुखांचा एक मेळावा घेतला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचा ‘मिंधे गट’ असा उल्लेख केला आणि राज ठाकरेंना ते ‘मुन्नाभाई’ म्हणाले होते.

उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपचा उल्लेख ‘कमळाबाई’ असा केला होता. आता मनसेच्या वतीने उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यात आले. मनसेचे पदाधिकारी यांनी ट्वीट करत शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.

मनसेने उद्धव ठाकरेंना ‘मामू’ म्हंटले आहे. अभिनेता संजय दत्तचा (Sanjay Dutt) चित्रपट मुन्नाभाई एमबीबीएस (Munnabhai MBBS) या चित्रपाटातील मामू (बोमन इराणी) यांची उद्धव ठाकरेंना उपमा देण्यात आली आहे.

गजानन काळे (Gajanan Kale) यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, आदित्य ठाकरेंसाठी वरळीत मनसेचा उमेदवार न देता राज ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखविला. 2012 साली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली असता, ठाणे मनपात सेनेच्या महापौरासाठी मनसेच्या 7 नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा दिला. मुन्नाभाईचे काळीज कळायला मामुंना अजून सात जन्म घ्यावे लागतील.

पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबई दौरा करणार आहेत. त्यावर देखील ठाकरे यावेळी बोलले. मुंबई शिवसेनेच्या हातातून काढण्यासाठी आता केंद्रीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत, असे ठाकरे म्हणाले.

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आपले गद्दार आणि आता त्यांच्या जोडिला मुन्नाभाईही आहेतच. सगळे एकत्र येऊन ते शिवसेनेवर तुटून पडणार आहे, असे देखील ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

‘काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राहुल गांधींचे मोठे वक्तव्य’

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडे शेवटचा पर्याय काय? अनिल परब म्हणाले…

मोहन भागवतांनी दिल्लीत मशिदीला दिली भेट; देशभरात चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप; मविआने मला गेली अडीच वर्षे

भाजपच्या मिशन ‘मुंबई’मध्ये आता पंतप्राधान मोदी उतरले