जळगावमध्ये मनसेच्या माजी शहराध्यक्षाची हत्या; परिसरात खळबळ

जळगाव | जळगावमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी शहराध्यक्षाची हत्या करण्यात आली आहे. दगडाने ठेचून श्याम दीक्षित यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडामुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे. जळगावातील सिंधी कॉलनी परिसरात श्याम दीक्षित यांचा मृतदेह आढळला आहे.

दगडाने ठेचून दीक्षित यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. मनसे कार्यकर्त्याची भररस्त्यात हत्या झाल्यामुळे शहरात चर्चेला उधाण आलं आहे. 

श्याम दीक्षित यांच्या हत्येचं कारण अद्याप उलगडलेलं नाही. राजकीय वैमनस्यातून दीक्षित यांची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, श्याम दीक्षित यांनी मनसेच्या जळगाव शहर अध्यक्षपदाची जबाबदारी काही वर्षांपूर्वी सांभाळली होती. त्यांच्या हत्येमागे काही राजकीय कनेक्शन आहे का याचा तपास पोलिस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-