“शासनाने काही नियम अटी लागू करुन मंदिरं खुली करावीत”

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने लॉकडाऊन लागू केले. या लॉकडाऊनमध्ये सर्व मंदिर-मस्जिद बंद करण्यात आले होते. तेंव्हापासून सर्व धार्मिक स्थळे बंदच आहेत. परंतू लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात शासनाने काही नियम शिथिल केले. त्यामध्ये त्यांनी दारुची दुकाने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे अनेक ठिकाणी दारुविक्री सुरु झाली आणि दारुच्या दुकानांबाहेर प्रचंड गर्दी पहायला मिळाली. हाच गर्दीचा मुद्दा पकडत पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दारुची दुकानं सुरु केली, तर मग आता मंदिरही खुली करा अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.

तर, शासनाने दारुची दुकान चालू करावी त्यामुळे शासनाला महसूल मिळेल ही मागणी सुध्दा पहील्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीच केलेली होती. त्यांच्या या मागणीला बऱ्यापैकी यश मिळालं. पण आता मंदिरांच्या बाबतीत मनसेची विनंती सरकार ऐकेल का? हे पहावं लागेल.

मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी या पत्रामध्ये शासनाने काही नियम अटी लागू करुन मंदिरं खुली करावीत, लोक स्वत: सुध्दा काळजी घेतीलच असंही या पत्रामध्ये ते म्हणाले आहेत. आता त्यांच्या या पत्रावर शासन आता काय मार्ग काढणार हे पहाव लागेल.

दरम्यान, आजच मुख्यमंत्र्यांचा विधानपरिषदेचा अर्ज भरला त्यामुळे त्यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्ज भरताना सर्व ठाकरे कुटूंबीय उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

-कसाबच्या साक्षीदाराचा उपचारखर्च भाजप उचलणार; फडणवीसांकडून ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर

-महाराष्ट्रात 25 हजार कंपन्या सुरु, 6 लाख जणांच्या हाताला काम- सुभाष देसाई

-मुंबई उच्च न्यायालयाचा कुख्यात डॉन अरुण गवळीला दिलासा!

-रिलायन्स जिओनं ‘या’ पॉप्युलर पॅकमध्ये केला मोठा बदल; रोज मिळत होता 2 जीबी डेटा

-दोन घरं, एक फार्म हाऊस; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘इतक्या’ कोटींची संपत्ती?