…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला नागपूर दौरा रद्द

नागपूर : नागपूरमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला आहे. विदर्भात 24 तासांत मुसळधार पाऊस होईल असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी त्यांचा आजचा नागपूर दौरा रद्द केल्याचं कळतंय.

नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. मुंबईमध्ये विविध कार्यक्रम करुन मोदी औरंगाबाद आणि नागपूरला जाणार होते. मात्र पावसामुळे त्यांचा नागपूर दौरा रद्द झाला आहे.

नागपुरात मोदींकडून मेट्रोचं उद्घाटन केलं जाणार होतं. पण मोदींचा नागपूर दौरा रद्द झाला आहे. मात्र मोदी औरंगाबाद आणि मुंबईतील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

नरेंद्र मोदी यांचं मुंबईत आगमन झालं असून त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेते उपस्थित होते.

दरम्यान, मुंबईमध्ये पोहचल्यानंतर नरेंद्र मोदींनी विले पार्लेमधील लोकमान्य सेवा संघाच्या गणपतीचं दर्शन घेतलं.

महत्वाच्या बातम्या-