महाराष्ट्र मुंबई

केंद्राने ठाकरे सरकारला आत्तापर्यंत ‘इतक्या’ हजार कोटींची मदत केली- देवेंद्र फडणवीस

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद बोलावली. यावेळी फडणवीसांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आर्थिक मदत केली त्याची माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने कोरोना काळात निधी उपलब्ध करुन दिला नाही, असा राज्य सरकारने केला होता. आत्तापर्यंत 5 हजार कोटींपेक्षा जास्त पैसे राज्याला दिले आहेत. मात्र केंद्राने काहीही दिलेच नाही असं ठाकरे सरकारकडून भासवलं जातं आहे, असा आरोप फडणवीसांनी केलाय.

पीपीई किट, N-95 मास्क यांचाही पुरवठाही केंद्राने केला आहे. तसेच आत्तापर्यंत 28 हजार 104 कोटींचा निधी केंद्राने राज्य सरकारला उपलब्ध करुन दिला आहे. तरीही केंद्राने काहीही दिलं नाही असं वारंवार सांगितलं जात आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.

दरम्यान, महाराष्ट्रातून 600 श्रमिक ट्रेन सुटल्या, प्रत्येक ट्रेनमागे 50 लाख केंद्राला खर्च, राज्याने केवळ तिकिटाचे सात ते नऊ लाख खर्च केलेत, असं फडणवीसांनी सांगितलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून काॅंग्रेसनं सत्तेतून बाहेर पडावं; ज्येष्ठ काॅंग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

-भाजपमध्ये वरिष्ठ नेते असतील, पण मी… नारायण राणेंनी भाजप नेत्यांना सुनावलं

-राज ठाकरेंचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पत्र; केली ‘ही’ मागणी

-महाराष्ट्रात आमचा सरकारला पाठिंबा, पण…- राहुल गांधी

-चार वाजता काय होणार? फडणवीसांच्या ‘या’ कृतीकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष!