काँग्रेसच्या ‘या’ माजी पंतप्रधानांचं नरेंद्र मोदींनी केलं तोंडभरून कौतुक

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडीओवरील आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात काँग्रेसचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना जयंतीदिनी अभिवादन करताना त्यांच्या कामगिरीचं आवर्जुन कौतुकही केलं आहे.

आज 28 जून रोजी भारत आपले माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना अभिवादन करत आहे. आजपासूनच त्यांची जन्मशताब्दी सुरु होत आहे. ते एक सर्वसामान्य राजकीय नेते होते. अनेक भाषांचं त्यांना ज्ञान होतं, असं मोदींनी म्हटलं आहे.

आपल्या निर्णयावर नरसिंहराव कायमच ठाम राहत असत. नरसिंहराव हे देशाचे नववे पंतप्रधान होते. त्यांनी 1991 ते 1996 या काळात पंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली. त्यांना परमीट राज संपवण्यासाठी जबाबदार धरलं जातं तसेच त्यांनी राजीव गांधी सरकारची समाजवादी धोरणं बदलली होती. त्यांना भारताच्या आर्थिक सुधारणांचं जनक म्हणूनही ओळखण्यात येतं, असं मोदींनी सांगितलं.

यंदाच्या वर्षात देशात एकामागून एक संकटं येत गेली. अशी संकटं येतचं असतात म्हणून संपूर्ण वर्ष खराब मानायची गरज नाही. वर्षभरात एक किंवा पन्नास अडचणी येऊ द्या त्यामुळे डगमगून जायची गरज नाही, अशा शब्दांत मोदी यांनी ‘मन की बात’मधून देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

महत्वाच्या बातम्या-

-‘पडळकर…रात्रभर झोप येणार नाही अशा शिव्या देऊ’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा पडळकरांना दम

-आषाढी एकादशीला विठूरायाच्या दर्शनाला जाणार का?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले …

-‘खरं राजकारण तर…’; शरद पवारांच्या त्या टीकेला काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर

-30 जूननंतर लॉकडाउन उठणार का?, उद्धव ठाकरे म्हणाले…

-पांडुरंग समजून पोलिसाचे पाय धरणारा वारकरी; सोशल मीडियावर व्हीडिओ तुफान व्हायरल