मुंबई : नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. एकेकाळी बाळासाहेब ठाकरे सर्वात मोठे नेते होते. त्यांच्या नावाचा फायदा भाजपला झाला. बाळासाहेबांच्या नावावर भाजप पक्ष महाराष्ट्रात वाढला. आज बाळासाहेब ठाकरे हयात नाही. आता मोदी सर्वात मोठे नेते आहे. जर डोनाल्ड ट्रम्प यांना मोदींचा आधार घ्यावा लागतो तर भारतातही आधार घ्यायला हवा, असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.
लोकसभेत युती झाली तेव्हा अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी 50-50 फॉर्म्युला निश्चित केला होता. मात्र निकालानंतर भाजपाला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं त्यामुळे शिवसेना सध्या निर्णायक परिस्थितीत आहे. महाराष्ट्रात मतांचे विभाजन होऊ नये ही दोन्ही पक्षांची गरज आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
जागावाटपात दिरंगाई होऊ नये असं वाटते, यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, इच्छुक खोळंबले असतात. मात्र 288 जागांचा निर्णय करताना सगळा विचार करावा लागतो, असं संजय राऊत काही दिवसांपूर्वी टीव्ही 9 मराठीच्या कार्यक्रमात बोलले होते.
सध्या देशाची धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय, अशी परिस्थिती आहे. एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत राऊतांनी यावर भाष्य केलं आहे.
दरम्यान, 2014 साली शिवसेनेतील काही नेत्यांना वाटत होते आपण सत्तेत गेलो पाहिजे पण माझं यावर मत वेगळं होतं. आम्ही सत्तेत गेलो नसतो तर चित्र वेगळं असतं, असा दावाही संजय राऊतांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या-
जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’मधून मोदींवर टीकेची झोड; अर्थव्यवस्था, बेरोजगारी, उद्योग यावरून मोदींना लक्ष्य https://t.co/Yr6Bmx2F8w #EconomicSlowdown
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 26, 2019
“मोदींनी जगभर दौरे करण्यापेक्षा देशात थांबून अर्थव्यवस्था सावरावी” https://t.co/YvZflie635 @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 26, 2019
राष्ट्रवादीने मला फोडलं नाही तर भाजपनेच मला काढून टाकलं; धनंजय मुंडेंच क्षीरसागरांना प्रत्युत्तरhttps://t.co/kNbTWYryjM @dhananjay_munde @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 26, 2019