मुंबई | गेल्या काही दिवसांपासून देशात चांगलीच राजकीय नाट्य रंगली आहेत. केंद्र सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात आ.रोप प्रत्यारो.पाच्या खेळी चालू असतानाच राज्यसभेत गदा.रोळ उडाला आहे. राज्यसभेतील आठ सदस्यांच्या निलंबनाबाबत सं.ताप अद्याप देखील कायम आहे. राज्यसभेत आपल्याबरोबर गै.रवर्तन झाल्याचा आ.रोप करत उपसभापती हरिवंश यांनी आज एक दिवसाचा उपवास धरला आहे. अशातच आता खासदारांच्या समर्थनार्थ राष्ट्र्ववादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार पुढे सरसावले आहेत.
शरद पवार यांनी खासदारांच्या समर्थनार्थ दिवसभर उपवास धरण्याची घोषणा केली आहे. राज्यसभेत खासदारांनी आपली मते व्यक्त केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं आहे, असा आ.रोप शरद पवार यांनी केला आहे.
राज्यसभेत शेतकऱ्यांशी संबंधित विधेयकावर चर्चा होणार होती. या विधेयकासंबंधित काही प्रश्न होते. राज्यसभेतील सदस्यांना या विधेयकावर चर्चा करायची होती. उपाध्यक्षांद्वारा लागू करण्यात आलेला हा नियम नक्की काय आहे, याविषयी या सदस्यांना जाणून घ्यायचं होतं. मात्र, या सदस्यांच्या म्हणण्याला राज्यसभेत टाळण्यात आलं होतं. जेव्हा त्या सदस्यांच्या प्रश्नांना राज्यसभेत टाळण्यात आलं तेव्हा राज्यसभेत वा.द सुरु झाला. मी आजपर्यंत असं कोणतंही विधेयक पास होताना पाहिलं नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
तसेच, तोंडी मतं घेवून हे विधेयक पास करण्यात आलं आहे. राज्यसभेतील इतर खासदारांना या विषयावर आपली मत मांडूनच दिली नाहीत. इतर सदस्यांचा हक्क हिस.कावून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. उपसभापतींनी राज्यसभेच्या नियमांना प्राधान्य दिलं नाही. जेव्हा सभेतील सदस्य त्यांचा विरोध करू लागले तेव्हा ते चहा पिण्यासाठी गेले होते. यामुळे निलंबित सदस्यांच्या समर्थनार्थ आज मी उपवास धरणार आहे, असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, शरद पवार हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी आपण उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
आरक्षणाच्या मुद्द्याबाबत आम्ही सुप्रीम को.र्टात अपील करणार आहोत आणि त्यासाठीच मी आज उद्धव ठाकरे यांना भेटलो आहे. मुख्यमंत्र्यांना हे विधेयक लवकरच मंजूर करायचं आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून रतन टाटांनी ‘या’ गाडीला दिलं चक्क कामगाराचं नाव; रेकॉर्डब्रेक विकली गेली गाडी!
‘क-क कंगना करणाऱ्या राज्य सरकारनं माझा नाद सोडला तर…’; कंगनानं राज्य सरकारला पुन्हा डिवचलं
‘रियाचं ड्र.ग्ज कनेक्शन दह.शतवादी गटापर्यंत आहे’; NCB प्रमुख राकेश अस्थाना यांचा दावा
सुशांतसिंग प्रकरणाला मोठं वळण; शरीरात सापडली ‘ही’ अत्यंत धक्कादायक गोष्ट