मणिकर्णिका फिल्म का सोडली?, सोनू सूदनं कंगणा राणावतबद्दल केला धक्कादायक खुलासा!

मुंबई | कंगना रनौत आपल्या वा.दग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. कंगनाचे चित्रपट देखील कोणत्या न कोणत्या करणामुळं नेहमीच चर्चेत असतात. कंगनाचा ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट देखील काही दिवसांपूर्वी चांगलाच चर्चेत होता.  कंगना रानौतनं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाच्या वेळी बरेच वा.दंग निर्माण झाले होते. ‘मणिकर्णिका’ चित्रपटाचे पहिले दिग्दर्शक कृष होते. तसेच अभिनेता सोनू सूद देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत होता. मात्र, या दोघांनी हा चित्रपट मध्येच सोडून दिला होता. सोनू सूदनं आता हा चित्रपट सोडण्यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे.

‘मणिकर्णिका’ चित्रपट मी खूप जड अंतकरणानं सोडला होता. या चित्रपटाचं शूटिंग झाल्यानंतर मी जेव्हा माझे चित्रपटातील सिन्स पहिले तेव्हा माझे 80 टक्के सिन्स चित्रपटातून कापले गेले होते. मी कंगनाला याविषयी विचारलं असता कंगनानं मला हे सिन्स पुन्हा शूट करावे लागतील असं सांगितलं होतं . यानंतर कंगना आणि माझ्यात मतभेद तयार झाले होते, असं सोनू सूदनं ‘मणिकर्णिका’ चित्रपटाविषयी बोलताना म्हटलं आहे.

कंगना माझी चांगली मैत्रीण असल्यामुळं मी तिला सांगितलं की मी हे करू शकत नाही. मी या चित्रपटाच्या पूर्व दिग्दर्शकाला चित्रपटासाठी हो म्हणालो होतो. मात्र नंतर मी या चित्रपटातून बाहेर पडणं योग्य समजलं, असं कारण सोनू सूदनं सांगितलं आहे.

तसेच या चित्रपटासाठी मी माझे चार महिने दिले होते. या चार महिन्यांत मी अनेक चांगले प्रोजेक्टही सोडले होते. यावेळी मी खूप दु.खावलो गेलो होतो पण याविषयी मी कोणालाही काहीही बोललो नाही, असंही सोनू सूदनं म्हटलं आहे.

कंगनाला स्वतःला हा चित्रपट दिग्दर्शित करायचा असल्यामुळं तिनं मला दिग्दर्शनात मदत मागितली होती. कंगना माझी चांगली मैत्रीण असल्यामुळं मी कंगनाला चित्रपटासाठी मदत करण्यास तयार झालो होतो. मात्र, चित्रपटातील सिन्स वरून झालेल्या वा.दामुळं मी हा चित्रपट सोडला, चित्रपट सोडण्यामागचं असं नेमकं कारण सोनू सूदनं सांगितलं आहे.

दरम्यान, सोनू सूदनं चित्रपट सोडल्यानंतर कंगनानं सोनूवर आरोप करत सोनूला महिला डिरक्टर बरोबर काम करायचं नव्हतं, असं म्हटलं होतं.  मात्र सोनूनं आता कंगनाच्या या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. मला महिला डिरेक्टरची काहीच अडचण नव्हती मी फराह खान यांच्याबरोबरही काम केलं आहे, असं सोनूनं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोदी सरकारची मनमाची चालू देणार नाही; ‘या’ कारणामुळं शरद पवारांनी धरला उपवास!

…म्हणून रतन टाटांनी ‘या’ गाडीला दिलं चक्क कामगाराचं नाव; रेकॉर्डब्रेक विकली गेली गाडी!

‘क-क कंगना करणाऱ्या राज्य सरकारनं माझा नाद सोडला तर…’; कंगनानं राज्य सरकारला पुन्हा डिवचलं

‘रियाचं ड्र.ग्ज कनेक्शन दह.शतवादी गटापर्यंत आहे’; NCB प्रमुख राकेश अस्थाना यांचा दावा

सुशांतसिंग प्रकरणातील ड्र.ग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या ‘या’ दोन प्रसिद्ध अभिनेत्रींची नावं आल्यानं खळबळ