नवी दिल्ली | देशाच्या राजकारणात भाजपच्या उद्यापासून आत्तापर्यंत खूप कमी भाजप नेत्यांना देशभर लोकप्रियता मिळाली आहे. त्यात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे अग्रस्थानी आहेत.
अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर भाजपला केंद्रीय सत्तेचा मार्ग दाखवण्यात विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी ठरले आहेत.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपनं विरोधी पक्षांना 2014 पासून आत्तापर्यंतच्या अनेक निवडणुकांमध्ये पराभवाची धुळ चारली आहे. परिणामी भाजपमध्ये मोदींच्या नावाचा अंमल चालतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा जयघोष संसदेत करण्यावरून आता तृणमुलच्या खासदार महुआ मोईत्रांनी (Mahua Moitra) भाजपला चांगलंच सुनावलं आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी यांच्या एका भाषणाचा दाखला देत मोईत्रांनी भाजपला सुनावलं. अटलजींच हे भाषण 1972 मधील राजकीय परिस्थितीवर आधारित आहे.
वाजपेयी यांचं वाईट स्वप्न हे आज सत्यात उतरल्याचा भास होत आहे. मोदी एखाद्या योद्ध्याप्रमाणं सभागृहात येत आहेत. रोमच्या कोलोसियममध्ये मोदींनी भारतीय संसदेला बदललं आहे, अशी टीका मोईत्रांनी केली आहे.
1972 जेव्हा तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नावाचा जयघोष केला गेला होता, तेव्हा वाजपेयींना लोकशाहीला हे घातक असल्याची टीका केली होती.
सर्वशक्ती दिल्लीत एकत्रित झाली आहे. सचिवालयातून एक समांतर कॅबिनेट चालवलं जात आहे. एका व्यक्तीला तानाशाह बनवण्यासारखी ही परिस्थिती आहे, असं अटल बिहारी म्हणाले होते, असंही महुआ मोईत्रांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या –
Deltacron: काळजी घ्या! महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे संशयित रूग्ण सापडले
“भारतातल्या स्युडो सेक्यूलर जमातीने…”, The Kashmir Files वर बोलताना फडणवीसांची बोचरी टीका
Sharad Pawar: शरद पवार म्हणतात, “ऊसाचं बिल कर्ज काढून नव्हे, तर माल विकून द्या”
Nitin Gadkari: “60 किलोमीटर अंतरावर…”, नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा
चीनमध्ये कोरोनाचं थैमान! सरकारच्या ‘या’ आदेशाने लोकांमध्ये भीतीचं वातावरण