मनी हाईस्टच्या ‘स्टाॅकहोम’ने घरी लावली गणपतीची पेंटिंग; फोटो तुफान व्हायरल

मुंबई | मनी हाईस्ट वेब सीरिजमध्ये ‘स्टॉकहोम’ची भूमिका साकारणाऱ्या इस्टार एस्बोच्या घरातील गणपतीचा एक मोठा फोटो पहायला मिळाला आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

इस्टार एस्बो सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच आता तिचा एक फोटो व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये स्टॉकहोम घरी काम करताना दिसत आहे. मात्र, या चित्रात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या मागे गणपतीची मोठी पेंटिंग दिसत आहे.

इस्टार एस्बो एक आंतरराष्ट्रीय ख्यातीची अभिनेत्री आहे. असं असलं तरी घरी गणेशाची पेंटिंग बसवण्यात आल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

इस्तार एस्बो ही एक स्पॅनिश कलाकार आहे. तिने मनी हाईस्टमध्ये मोनिका गझतांबाइड उर्फ ​​स्टॉकहोमची भूमिका साकारली आहे. मनी हाईस्ट या वेब सिरीजला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

दरम्यान , मनी हाईस्टचा पाचवा सिझन नुकताच रिलीज झाला होता. बॅक ऑफ स्पेनमध्ये दरोडाचा शेवट या सिझनमध्ये दाखवण्यात आला आहे. अनेकांना या मनी हाईस्ट सारिजने भुरळ घातली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

पालकांनो काळजी घ्या! लहान मुलांमध्ये ओमिक्राॅनची ‘ही’ लक्षणं दिसतात

चिंताजनक! फक्त 2 दिवसात नव्या रूग्णसंख्येत दुप्पटीने वाढ; वाचा आकडेवारी

“नाना मोदींबद्दल तोंड सांभाळून बोला”, चंद्रकांत पाटलांचा सज्जड दम

मोदींचा ताफा अडवला अन् ‘फुलराणी’ भडकली, म्हणाली…

पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चूक, पंजाबमधील रॅली रद्द; भाजप नेत्यांची आक्रमक भूमिका