मराठी रंगभूमीवर पुन्हा शोककळा! ‘हा’ बडा अभिनेता काळाच्या पडद्याआड

मुंबई | चित्रपट सृष्टीसाठी 2020 हे वर्ष अतिशय वाईट ठरलं आहे. अनेक दिग्गज लोकांनी या वर्षात जगाचा निरोप घेतला आहे. अशातच आता मराठी रंगभूमीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जेष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं दुःखद नि.धन झालं आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून अविनाश खर्शीकर यांची प्रकृती चिंताजनक होती. ठाण्यातील एका रुग्नालयात खर्शीकर यांच्यावर उपचार देखील चालू होते. मात्र, गुरुवारी सकाळी अविनाश खर्शीकर यांची मृ.त्यूशी चाललेली झुंज थांबली. सकाळी 10 वाजताच्या सुमारास 68 वर्षीय खर्शीकर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं दुःखद निध.न झालं आहे.

अविनाश खर्शीकर यांच्या अचानक जाण्यानं संपूर्ण मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. अनेक मराठी अभिनेत्यांनी त्यांच्या मृ.त्यूचे दुःख सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे तसेच अभिनेता विजय कदम यांनीही ट्वीट करत अविनाश खर्शीकर यांच्या आ.त्म्यास शांती लाभो ही प्रार्थना केली आहे.

अविनाश खर्शीकर यांनी आपल्या तारुण्यात अभिनय क्षेत्रात सुरुवात केली होती. त्यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये देखील काम केलं आहे. खर्शीकर यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

खर्शीकर यांनी 1978 साली मराठी चित्रपट क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं होतं. ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

आई थोर तुझे उपकार, बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार, जसा बाप तशी पोरं, आधार यांसारख्या अनेक चित्रपटांत खर्शीकर यांनी काम केलं आहे. प्रत्येक चित्रपटातील आपली भूमिका त्यांनी मन लावून केली आणि प्रेक्षकांची मनं जिंकली.

तसेच खर्शीकर यांच्या अनेक नाटकांनाही रसिकांची पसंती मिळाली आहे. वासूची सासू, अप.राध मीच केला, तुझ आहे तुझ्यापाशी, सौजन्याची एैशी तैशी, लफडा सदन, दिवा जळू दे सारी रात ही त्यांची काही गाजलेली नाटकं आहेत. तसेच खर्शीकर यांनी काही टेलिव्हिजन मालिकांमध्येही काम केलं आहे.

90 च्या दशकात खर्शीकर यांनी आपल्या अभिनयाबरोबरच लुकमुळेही लोकांना भुरळ घातली होती. आपल्या हटके शैलीमुळे ते चित्रपट सृष्टीत प्रचंड गाजले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनामुळे नपुंसकत्व येवू शकतं; संशोधकांचा धक्कादायक निष्कर्ष

सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरे होते टार्गेटवर, स्टडी रिपोर्टचा धक्कादायक खुलासा!

सुशांत सिंह राजपूतनं आ त्मह.त्याच केली हे कशावरून? एम्सच्या टीमनं दिलं स्पष्टीकरण

अनुरागवर लैं.गिक छ.ळाचा आरोप करणाऱ्या पायलचा ‘त्या’ वक्तव्यावरून यूटर्न, माफी मागायलाही तयार

नेहा कक्करच्या लग्नाची वार्ता ऐकताच नेहाचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहली म्हणाला…