“बाप सरदार असला म्हणून मुलगा सरदार व्हायला पाहिजे असं काही नसतं”

रत्नागिरी : बाप सरदार असला म्हणून त्याचा मुलगा सरदार व्हायला पाहिजे, असं काही नसतं, काळाच्या पुण्याईवर आजचा दिवस स्वराज्यात उगवत नव्हता. त्या छत्रपतींची ही भूमी आहे, अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर घणाघाती टीका केली.

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांनी यावेळी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम हे संभाव्य उमेदवार आहे. मतदारांनी याची काळजी करू नये, राष्ट्रवादीच्या वतीने मी शब्द देतो संजय कदम यांना निवडून द्या, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

आमच्याकडून भास्कर जाधव गेलेत, सुनील तटकरे दिल्लीत आहेत. त्यामुळे संजय कदम यांना मंत्री बनण्यासाठी स्कोप असल्याचं अमोल कोल्हेंनी संगितलं.

दरम्यान, शिवसेनेनं कोकणाला काय दिलं? हा सवाल या निवडणुकीत त्यांना विचारा. या मतदारसंघात बाराशे कोटींची विकास कामं आणली, असं शिवसेनेचे मंत्री म्हणतात,हे जनतेला मान्य आहे का? असा प्रश्न शिवसेनेला विचारावा, असं आवाहनही खासदार कोल्हेंनी केलं.

महत्वाच्या बातम्या-