‘मी आतापर्यंत आक्रमक होतो पण…’; खासदार संभाजीराजेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई | मी आत्तापर्यंत आक्रमक होतो परंतू आता मी उद्विग्न झालो असल्याचं वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केलं. मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचं संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं आहे.

मला समन्वयक यांनी सांगितल की टोकाची भूमिका घेऊ नका. परंतू सरकार काहीच हालचाल करतं नाही. त्यामुळे माझी भूमिका आहे की आता 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मी सर्वांना घेऊन जाणारा माणूस आहे मी शाहू महाराजांचा वारस आहे. मला सगळ्यांना एवढचं सांगायचं आहे की आम्हाला टिकणारे आरक्षण द्या. मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हात जोडून विनंती केली की आरक्षण द्या. आरक्षण कशामुळे गेलं हे देखील सांगितलं परंतू काहीच हालचाल झाली नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

मी आरक्षण रद्द झाल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन दखल करा असं सांगितल. परंतू खुप दिवसांनंतर याचीका दाखल केली. सध्या त्याची काय परिस्थिती आहे हे काहीच माहिती नाही. माझं स्पष्ट मत आहे की समिती स्थापन करा. परंतू अजून काहीच केलं नसल्याचं संभाजीराजे म्हणालेत.

2007 पासून मी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाज देखील वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली. मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे असं नाही. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झालं. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली. परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही, असं त्यांनी म्हटलंय.

सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे की 50 टक्क्यांच्यावर आरक्षण द्यायचं असेल तर अपवादात्मक परिस्थीत असायला हवी. अनेकजण म्हणातात की ओबीसीमधून आरक्षण द्यायला हवं, परंतु माझं म्हणणं आहे की टिकणारं आरक्षण द्या, असंही त्या म्हणाल्यात.

मी सर्व नेत्यांच्या दारी गेलो. मूक आंदोलन कोल्हापुरात केलं परंतू, यांनी काहीच केलं नाही. मोजून पाच ते सहा मागण्या आहेत परंतू अजूनही मान्य होत नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

‘आय रिपीट, भाजपचे साडे तीन नेते…’; संजय राऊतांच्या नव्या दाव्याने खळबळ 

डॉ. सुवर्णा वाजे प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर

राकेश झुनझुनवालांना मोठा झटका; एका दिवसात झालं ‘इतक्या’ कोटींचं नुकसान 

“महिला हिजाब घालत नाही म्हणून बलात्कार होतात” 

राष्ट्रवादीला मोठा झटका, ‘इतक्या’ नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश