“टोपे साहेब, विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची देखील व्यवस्था करा”

मुंबई | राज्यात कोणत्याना-कोणत्या कारणावरून विरोधी पक्ष आणि सत्ताधऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची खेळी पाहायला मिळतच असते. अशातच मागिल महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात आरोग्य विधागाच्या परिक्षा होणार होत्या परंतू त्या परिक्षा ऐनवेळी रद्द करून, आता त्या 24 ऑक्टोबर रोजी घेण्याचे ठरले आहे,

या दिवशी दोन पेपर होणार आहेत. परंतू विद्यार्थ्यांना एका पेपरसाठी एक जिल्ह्यातील केंद्रावर पेपर द्यावा लागणार आहे. तर दुसऱ्या पेपरसाठी वेगळ्या जिल्ह्यातील केंद्रावर द्यावा लागणार आहे. यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

अशातच भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही प्रसार माध्यमांशी बोलताना यामुद्यावरून वक्तव्य केलं आहे.एकाच दिवशी होणाऱ्या दोन पेपरसाठी सकाळी एका वेगळ्या जिल्ह्यात आणि दुपारी आणखी वेगळ्या जिल्ह्यात केंद्र देण्याचा ‘महा-पराक्रम’करण्यात आला आहे.

या परीक्षार्थींनी ही परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे टोपे साहेब या परीक्षार्थींना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी आता हेलिकॉप्टरची सुद्धा व्यवस्था करा, असा टोला भातखळकरांनी टोपेंना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरे म्हणतात सरकार पाडून दाखवा, पण ज्यादिवशी हे सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणार देखील नाही”

सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचे दर

भिवंडीमध्ये फर्निचर कारखान्यांना लागली आग, सहा तासांनंतर अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश

आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये झाली वाढ

“आम्हाला उद्धवजींमध्ये राहूल गांधी स्पष्ट दिसू लागले आहेत”